Onion sakal
मुंबई

Onion Selling Center : कल्याण-डोंबिवलीत लवकरच सुरू होणार नाफेडकडून कांदा विक्री केंद्रे

ऐन दिवाळीत कांद्याचे भाव कडाडले कांद्याचा बाजार स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आता जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध होणार आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ऐन दिवाळीत कांद्याचे भाव कडाडले कांद्याचा बाजार स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आता जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध होणार आहे. सवलतीच्या दरात नागरिकांना कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून मोबाइल व्हॅनद्वारे एक ते दोन किलोच्या पॅकिंगमध्ये 25 रुपये किलो दराने कांदा दिला जाणार आहे.

ऐन सणासुदीला कांद्याचे दर वाढले असून नागरिकांना याचा फटका बसत आहे. कांद्याचा बाजार स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत जनतेला सवलतीच्या दरात कांदा मिळावा यासाठी नाफेडकडून मोबाइल व्हॅनद्वारे कांदा विक्री केली जाणार आहे. यामुळे नागरिकांना एक ते दोन किलोच्या पॅकिंगमध्ये 25 रुपये किलो दराने कांदा दिला जाणार आहे.

यासाठी येत्या काळात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल आदी 100 ठिकाणी सवलतीच्या दरात कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. दिवाळीत नागरिकांना नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरातील विकल्या जाणाऱ्या कांद्यामुळे दिलासा मिळत आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करत असते.

या माध्यमातून नागरिकांना महागाईची झळ बसू नये या उद्देशातून भारत चणाडाळ, भारत आटा व कांदा विक्री केंद्र माध्यमातून नागरिकांना दिलासा दिला जाणार आहे मात्र सरकारच्या या योजनेमुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी असून सध्या कल्याण बाजारपेठेत 40 ते 45 रुपयाने कांदा दिला जात असून सरकारच्या या भूमिकेमुळे ग्राहकाला दिलासा तर मिळेल मात्र कॉलिटी मिळणार नाही असे मत विक्रेते मांडत आहेत.

व्यापारी वर्गात नाराजी असून शासनाचे धोरण हे बाजार स्थिर ठेवण्यासारखं आहे. मात्र शासनाच्या व बाहेरील कॉलिटी मध्ये फरक राहणार नाही असे मत कांदा विक्रेते सागर पाटील यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

SCROLL FOR NEXT