Mumbai sakal
मुंबई

Mumbai : डोंबिवलीत दिवसा ढवळ्या होतेय चोरीमहावितरणच्या इलेक्ट्रिक बॉक्सचा दरवाजाच काढून नेला

चोरी करताना महिला व्हिडिओ मध्ये कैद

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केवळ रात्रीच नाही तर दिवसा ढवळ्याही चोर चोरी करु लागले आहेत. आता तर आपल्याला कोणी पाहील याचाही धाक या चोरांना राहीला नसल्याचा प्रकार एका व्हिडीओ मधून उघडकीस येत आहे. रस्त्यावरील महावितरणच्या इलेक्ट्रिक बॉक्सचा दरवाजाच काढून चोरुन नेल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे. एका नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद केली आहे. विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच ही चोरीची घटना दिवसा ढवळ्या घडली असून पोलिसांचा वचक चोरांवर राहिला नसल्याचे यातून दिसून येते.

डोंबिवली पश्चिमेतील रिद्धी सिद्धी इमारती समोर असलेल्या महावितरणच्या एका इलेक्ट्रिक बॉक्सचा लोखंडी दरवाजा एका महिलेने काढून घेतला. त्यानंतर तेथे एक रिक्षाचालक येतो, सदर महिला रिक्षात बसून निघून जाते. ही चोरीची घटना एका नागरिकाने मोबाईलच्या कॅमेऱ्याच चित्रित केली असून सध्या हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. पश्चिमेतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या जवळ ही घटना दिवसा ढवळ्या घडली आहे. यावर आता पोलीस काय कारवाई करतात हे पहावे लागेल.

शहरात भुरट्या चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसा ढवळ्या बंद घरांना चोरांकडून लक्ष केले जात असताना आता तर सार्वजनिक रस्त्यावर उघड उघड चोरीच्या घटना घडत असल्याचे या व्हिडीओ वरुन स्पष्ट होते. आपल्याला कोणी पाहील, आपली चोरी पकडली जाईल आणि आपल्याला शिक्षा होईल याची भिती देखील या चोरांना राहीलेली नाही. या विरोधात आता पोलीस काय कारवाई करतात हे पहावे लागेल. तसेच महावितरणचा इलेक्ट्रिक बॉक्स उघडा पडल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीसांसह महावितरणने देखील याकडे कसे लक्ष देते हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT