kalyan shivaji chauk sakal
मुंबई

Kalyan News : कल्याणमधील शिवाजी चौकातील वाहतुकीत बदल !

Kalyan News : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक दोन दिवस अन्य मार्गावरुन वळविण्यात आली आहे

शर्मिला वाळुंज

Kalyan News : कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकातील एका अतिधोकादायक इमारत तोडण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शहरातील सर्वाधिक वाहन वर्दळीचा हा रस्ता असल्याने येथील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या रस्त्याकडून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक दोन दिवस अन्य मार्गावरुन वळविण्यात आली आहे.

शिवाजी चौकात भगवानदास मेन्शनही 40 वर्षापूर्वीची तीन माळ्याची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. ही इमारत कल्याण डोंबिवली पालिकेकडून जमीनदोस्त करण्याचे काम केले जाणार आहे.

वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात बदल करण्यास सशर्त परवानगी दिल्याने पालिकेने हे तोडकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला. या तोडकामामुळे शिवाजी चौकातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांना या प्रवेश बंदीतून सूट आहे.

कल्याण शहराच्या विविध भागातून शिवाजी चौक मार्गे पुष्पराज हाॅटेल मार्गे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक शिवाजी चौक येथे बंद केली जाणार आहे. ही वाहने गुरुदेव हाॅटेल, कल्याण रेल्वे स्थानक ते दीपक हाॅटेलकडून पुष्पराज हाॅटेलमार्गे किंवा मुरबाड रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह उफाळला! शिंदे सेनेत बंडाची चाहूल; वाढत्या असंतोषामुळे नेते भाजपच्या वाटेवर?

Rain Alert: संभाजीनगरात अवकाळी वादळाचा तडाखा! पावसासह वादळी वाऱ्यांचा कहर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या दहीहंडामध्ये कडाक्याच्या उष्णतेनंतर पावसाची हजेरी

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

SCROLL FOR NEXT