traffic police sakal media
मुंबई

दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला दगड मारून केले जखमी

रविंद्र खरात

कल्याण : कल्याण नगर महामार्ग वरील शहाड जकात नाका परिसरात आज शुक्रवार ता 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते साडे सहा च्या दरम्यान एका दुचाकी स्वाराने बाईक अडविल्याच्या मनात राग धरून तेथील वाहतूक पोलिसाला दगडाने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली असून कल्याण पुन्हा वाहतूक पोलीस कर्मचारी वर्गाचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . (Mumbai news)

याबाबत कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ता 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास कल्याण नगर महामार्गावरील शहाड जकात नाक्याजवळ बेशिस्त वाहन चालक विरोधात कल्याण वाहतूक पोलिसांची धडक कारवाई दरम्यान वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पटाईत यांनी मोहना वरून कल्याण कडे जाणाऱ्या राहुल रोकडे बाईक स्वार याने हेल्मेट न घातल्याने त्याची बाईक अडविण्याचा प्रयन्त केला मात्र राहुल ने पोलिसांना हेलकावणी देत पुढे गेला आणि पुन्हा परत चालत येऊन पोलिसांना येऊन हातात दगडी घेऊन जाब विचारू लागला की मला का मारले ? त्याला पोलिसांनी शांत केले.

मात्र अचानक राहुल ने हातातील दगड वाहतूक पोलीस जमादार प्रकाश पटाइत यांच्या दिशेने फिरकविला यात पटाईत जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असून बाईक स्वार राहुल रोकडे याला महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .शहरात बेशिस्त वाहन चालकांना आम्ही शिस्त लावतो , पोलिसावर हल्ला सहन केला जाणार नाही , वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे , जखमी जमादारची वैद्यकीय तपासणी केल्या नंतर त्यानुसार महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी स्पष्ट केले मात्र या घटनेने वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT