Crime Sakal
मुंबई

Fraud News : फेसबुक मैत्री करत चार तरुण तरुणींना 24 लाखाचा गंडा; आरोपींना केले जेरबंद

सध्या मोबाईलच्या युगात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात फसवण्याचे प्रकार घडत आहेत.

महेंद्र पवार

कासा : सध्या मोबाईलच्या युगात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात फसवण्याचे प्रकार घडत आहेत. अशीच एक घटना कासा पोलीस ठाण्यात घडली असून फेसबुक वरून मैत्री करत रेल्वेत सरकारी नोकरी लावून देते देतो, असे आमिष दाखवून एका तरुणीची फसवणूक झाल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्या प्रकरणी तपास करत कासा पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

डहाणू तालुक्यातील योगिता महादू चौधरी या तरुणींनी दिलेल्या तक्रारीनुसार एका आरोपीला नाशिक मधून तर दोघांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कासा पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आल आहे.

मुख्य आरोपी दीपक किशोर दर्शन रा. बोईसर हा फेसबुकच्या माध्यमातून तरुण-तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवीत असे व मैत्री करीत असे. त्यानंतर तो आरोपी यांच्या इतर साथीदारासह फेसबुक वरून मैत्री केलेल्या तरुण-तरुणींना तुम्हाला रेल्वेत नोकरी लावून देतो असं अमिष दाखवून लाखो रुपये उकळीत असे.

योगिता चौधरी या तरुणीने आपल्याला नोकरी लावून देण्याकरता आरोपी यास तब्बल चार लाख रुपये दिले होते. तिच्यासह आणखी तिघांनी चार चार लाख रुपये दिल्याची साक्ष कासा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर नोकरीसाठी आरोपींनी उत्तरे न दिल्याने तसेच काही दिवसांनी आरोपीने आपला फोन बंद केल्याने योगिता हिने कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

कासा पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पीएसआय संदीप नागरे यांनी सापळा रचत मुख्य आरोपी दीपक दर्शन यास नाशिकहून अटक केली. तर विवेक चंद्रा व राहुल पाल यांना उत्तर प्रदेशात जाऊन अटक केली. यांच्यावर पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 34 अशा कलमांद्वारे गुन्हा दाखल केला आहे. त्यांना तारीख 19 रोजी न्यायालयात हजर करण्यात आल आहे.

या आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून राज्यात अनेक तरुण तरुणींना गंडवले असेल असा संशय पोलिसांना असून, त्यांच्याकडून कोणती फसगत झाल्यास साक्ष द्यावी. व अशा प्रकारापासून सावध राहावे असे आवाहन पोलिसातर्फे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या पाणीप्रश्नावर पालिकेला विहिरींची आठवण, विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची योजना

अमेरिकेत हिंदू मंदिरात नरसंहाराचा कट, गोळीबार करताना ट्रिगर जाम झाल्यानं अनर्थ टळला, १९ वर्षीय तरुणाला अटक

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांच्या लेकाचा संयम संपला; नाव न घेता दिलं उत्तर; म्हणाला- मी त्यांना एवढंच सांगेन...

Latest Marathi News Update : कराड येथील कृष्णा साखर कारखान्याचे गाळप बंद, माजी खासदार राजू शेट्टी कारखानास्थळी दाखल

Mohol Sugarcane Protest: ऊसदराचा तिढा पुन्हा पेटला! पहिली उचल पाच हजार रुपये द्या; कुरुलमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडविला

SCROLL FOR NEXT