Kirit Somaiya esakal
मुंबई

अडसुळांना ईडीची नोटीस; सोमय्या म्हणाले, 'घोटाळेबाजांविरुद्ध....'

९४ कोटी छोटया गुंतवणूकदारांचे गेले. कोट्यवधी रुपये अडसुळाच्या खात्यात आले. गुंतवणूकादारांसाठी उद्धव ठाकरेंनी काही कारवाई केली नाही.

रश्मी पुराणिक

मुंबई: सिटी कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा (ct cooperative bank scam) प्रकरणात शिवसेना (Shivsena) नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ (anandrap adsul) यांच्याविरोधात झालेल्या कारवाईचे भाजपा (bjp) नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. "आनंदराव अडसुळांनी सिटी को ऑपरेटिव्ही बँक बुडवली. ९४ कोटी छोटया गुंतवणूकदारांचे गेले. कोट्यवधी रुपये अडसुळाच्या खात्यात आले. गुंतवणूकादारांसाठी उद्धव ठाकरेंनी काही कारवाई केली नाही" अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.

"ईडीने अनेक समन्स पाठवले तरी अडसूळ जात नाहीत. आता अटक करण्यात आली. छोट्या गुंतवणूकदारांसाठी अडसुळांविरोधात झालेल्या या कारवाईचे मी स्वागत करतो. या सगळ्या मंत्र्यांनी, नेत्यांनी जनतेला लुटायचं आणि कारवाई झाली की सूडापोटी म्हणायचं. घोटाळेबाजांविरुद्ध कारवाई होणारच" असे किरीट सोमय्या म्हणाले.

अडसुळांवर काय आरोप आहे?

'सिटी कोऑपरेटिव्ह बँकेत कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होते. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर दाखल झाला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती', असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

विद्यापीठाचा ३० जुलैला पदवीदान समारंभ! पद्मभूषण जे. बी. जोशींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ तर पद्मश्री प्रभूणेंना ‘डी.लिट.’; राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान, वाचा...

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT