Kishori-Pednekar sakal media
मुंबई

"महापौरांचा अपमान करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करा"

मिलिंद तांबेः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचा समाज माध्यमांवर (social Media) अपमान करणाऱ्या पोस्ट (Disrespect Post) करणाऱ्यांवर कारवाई करण्यात (Strict Action) यावी याबाबतचं पत्र भाजप महिला नगरसेविकांनी (Letter from bjp) पोलिसांना दिले आहे.

महापौर या मुंबईच्या प्रथम नागरिक आहेत. त्यांचा अपमान म्हणजे मुंबईकरांचा अपमान आहे. अशावेळी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे चुकीचा अर्थ काढणारे पोस्ट हे समाज माध्यमांवर व ट्विटर वर काहीजण जाणून बुजून पसरवित आहेत. तसेच प्रत्यक्ष पत्रकार परिषदेत भाजपा नेते आमदार आशिष शेलार हे जे बोलले ते यु ट्युब वर उपलब्ध आहेच. आणि त्याचा अर्थ सुस्पष्ट असतानाही वस्तुस्थितीचा विपर्यास करून वक्तव्याची तोडमोड करून नको ते वक्तव्य महापौरांशी जोडून महापौरांचा अपमान काहीजण जाणून बुजून करीत आहेत.

आशिष शेलार यांनी केलेली टीका ही सत्ताधारी शिवसेनेतील सर्वच पदसिद्ध अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या बाबत आहे. ती कोणाही एका व्यक्तीबाबत नाही. आणि त्यांनी दुसऱ्याच वाक्यात त्यांना नक्की काय म्हणायचं आहे याबाबत सुस्पष्ट खुलासा केलेला आहेच. परंतु यानंतरही व्हिडीओ मधील विशिष्ट तुकडाच विचारात घेऊन वस्तुस्थितीचा विपर्यास करीत मुंबईच्या महापौरांचा अपमान काहीजण समाज माध्यमांवर करीत आहेत. याबाबत आज भाजप महिला नगरसेवकांनी पोलिसांना पत्र देत कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT