kishori-pednekar sakal media
मुंबई

'..त्याच्या आधी लंकेला आग लागावी' जाधवांवरील छाप्यानंतर पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलंय. (IT Deparment raids Yashwant Jadhav House)

त्यामुळे शिवसेनेचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधव यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांकडून काहीही अनूचित घडू नये, यासाठी त्यांनी उपस्थिती लावल्याचं सांगितलं. (Income Tax Raid on Yashwant Jadhav)

जे जे करायचं आहे, ते करा. निवडणुकीच्या तोंडावर सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाधव यांचा सगळा रेकॉर्ड बाहेर येऊ दे. ते स्वच्छ आहेत, असं पेडणेकर म्हणाल्या. सूडबुद्धीने ही करवाई सुरू झाली आहे. या कारवाया झाल्याने काहींना आसूरी आनंद होत आहे. मात्र, त्याचा गाजावाजा करण्याची गरज नाही. संपूर्ण जग पाहतंय हे काय चाललंय ते, जाधव है भीमसैनिक आहेत. ते अशाने डॅमेज होणार नाहीत. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय. (Kishori Pednekar Speaks on Yashwant Jadhav IT Raid)

या चौकशीत जे काही असेल, ते स्पष्ट होऊ द्या. खरी माहिती जनतेसमोर येण्याची गरज आहे. मात्र, सध्या सगळे लंकेला आग लागल्यासारखे पळत सुटले आहेत. त्यांना आसूरी आनंद मिळतोय. पण यंत्रणा ही दुधारी तलवार आहे. एक बाजू आमच्यावर उगारल्यास दुसरी बाजू देखील तुमच्यावर उगारली जाईल, असं त्या म्हणाल्या. केंद्रीय यंत्रणा तपास करत आहे त्यांना डिस्टर्ब करण्याचा हेतू नसल्याचं पेडणेकरांनी स्पष्ट केलं.

शिवसैनिकांनी काही अनूचित प्रकार करू नये, यासाठी आल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन मी करते, असं त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Garbage Dump Collapse : मोशी दुर्घटनेत 25 दिवसांचं बाळ झालं पोरकं, तर 2 आठवड्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवऱ्याचा अंत; नातेवाइकांचा आक्रोश पाहून पाषाणही पाघळेल

Jayden Adams: वर्ल्डकप फुटबॉलमध्ये खेळलेल्या २५वर्षीय आफ्रिका खेळाडूचे निधन

Shreyas Iyer: क्लीन स्वीपनंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा; 'या' चुकीमुळे मालिकाच हातातून गेली! इंग्लंड दौऱ्यात नेमकं काय चुकलं?

Latest Marathi News Update : आंदोलनात सहभागी झाल्याने शिक्षकांचा एक दिवसाची पगार कापणार

Pimpri: विनापरवाना उभारली तीनमजली इमारत; मोशीतील बांधकामाबाबत अनेक प्रश्न, जबाबदारी कोणावर?

SCROLL FOR NEXT