दरड कोसळली sakal
मुंबई

कल्याणमध्ये दरड कोसळली; इशाऱ्याकडे नागरिकांचं दुर्लक्ष, अधिकारी हतबल

या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही

रविंद्र खरात (बातमीदार-कल्याण )

कल्याण : कल्याण पूर्वमधील हनुमान नगर कुष्ठ वसाहतजवळ मध्यरात्री दीडच्या सुमारास टेकडीवरील दगड आणि माती सरकल्याने एकच खळबळ माजली मात्र सुदैवाने कुठलेही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून 5 कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात मागील 24 तासात 140 मिमी पाऊस पडला असून 1 जून पासून आत्तापर्यंत 1489 मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे . सोमवार 4 जुलै रोजी सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास कल्याण पूर्व मधील हनुमान नगर कुष्ठ वसाहत परिसरातील दरड कोसळली होती ती घटना ताजी असताना त्याच ठिकाणी आज मध्यरात्री दिडच्या सुमारास टेकडी वरील मोठे मोठे दगड आणि माती सरकून खाली आल्याने एकच खळबळ माजली.

या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख नामदेव चौधरी , सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांचे पथक आणि एन डी आर एफ पथक प्रमुख राजेश यावले यांच्या पथकाने तेथील 5 कुटुंबातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले असून पुन्हा दुर्घटना घडू नाही म्हणून पाहणी करून उपाय योजना करू अशी माहिती एन डी आर एफ प्रमुख राजेश यावले यांनी दिली .

पालिका हतबल ...

दरड कोसळण्याच्या घटना पाहता दरवर्षी पावसाळ्यात पालिका तेथील रहिवाशांना नोटीस बजावते तरी तेथील नागरिक ऐकत नसल्याने पालिका अधिकारी हतबल झाले असून मोठी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Cancel : आखाताकडे जाणारी तीन विमाने पुण्यातून रद्द

Latest Marathi News Live Update : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार

CIDCO Lottery: नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सिडकोने गृहनिर्माण योजनेची अंतिम मुदत; आता शेवटची तारीख काय?

Horoscope : नवा महिना, नवा राजयोग! उद्या 1 मार्चपासून पुढचे 4 दिवस 'या' 4 राशीच्या लोकांसाठी लकी, होणार धनलाभ

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

SCROLL FOR NEXT