मुंबई

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांना खूशखबर!  फरहान अख्तर, रितेश सिधवानी 'शर्माजी नमकिन' करणार पूर्ण

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ’शर्माजी नमकिन’ त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडणार होते. परंतु, लॉकडाऊन संपल्यानंतर चित्रीकरण पूर्ण करण्यात येईल, असे एक्सेल एंटरटेन्मेंटतर्फे फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी सांगितले. 

नीतू कपूर यांची भावनिक पोस्ट, ऋषी यांचा हसरा फोटो शेअर करत म्हणाल्या 'आमची कहाणी संपली...'

रक्ताच्या कर्करोगाशी दोन वर्षे झुंज दिल्यानंतर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (67) यांचे गुरुवारी (ता. 30) निधन झाले. न्यू यॉर्क शहरात उपचार घेतल्यानंतर ते 'शर्माजी नमकिन' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रीकरण थांबले. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंटतर्फे निर्मिती असलेल्या या चित्रपटात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे हा चित्रपट अपूर्ण राहिला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषी कपूर यांनी या चित्रपटाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण केले होते. त्यांचे फक्त काही भागांचे चित्रीकरण बाकी होते. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हा चित्रपट पूर्ण करणार आहेत. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत जुही चावला मुख्य भूमिकेत आहे. जवळपास दहा वर्षांनंतर हे दोघे एकत्र काम करत होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर जुहीने या चित्रपटाच्या चित्रीकरणातील काही आठवणी ट्विटरवरून शेअर केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: मोठी बातमी! थलापती विजय यांच्या TVK पक्षाच्या बहुमताचा आकडा पार; CPI-CPM च्या पाठिंब्याने समीकरण बदललं

BAN vs PAK : बांगालदेशने घरी बोलवून पाकिस्तानची जिरवली! कर्णधार नजमूल होसैनने शतकासह रचला इतिहास, मोमिनूलच्या ९१ धावा

SSC Exam Result : माढा तालुक्याचा दहावीचा निकाल ९२.३४ टक्के; १८ शाळांचा निकाल शंभर टक्के, प्रज्ञा चवरे ९८.४० गुण मिळवत माढा केंद्रात प्रथम

Farhan Azmi: ‘भारत माता की जय’ बोलू पण, ‘वंदे मातरम्’ नाही, मुस्लिम नेत्याचं वादग्रस्त विधान

Raigad Fort Heatwave Impact : शाळांना सुट्टी लागली तरी किल्ले रायगड 'हाऊसफुल्ल' होईना! इतिहासाच्या साक्षीदाराकडे पर्यटकांनी का फिरवली पाठ?

SCROLL FOR NEXT