Leopards Attack esakal
मुंबई

देवळे विभागात बिबट्याची दहशत; परिसरातील नागरिक भयभीत

देवेंद्र दरेकर

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भाग असणाऱ्या देवळे विभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून येथील शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

पोलादपूर - पोलादपूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भाग असणाऱ्या देवळे विभागामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा (Leopard) वावर वाढला असून येथील शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. तर दोन दिवसापूर्वी देवळे (Devale) येथील शेतकरी गोविंद धोंडू केसरकर यांची कालवड बिबट्याने हल्ला (Attack) करून मृत केली आहे. व याच्या अगोदर दोन महिन्यापूर्वी श्री. विष्णू मुरडे व श्री. केसरकर यांच्या गुरांवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे या विभागात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून, त्यावर वन विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दरम्यान, देवळे येथे बिबट्याने हल्ला केला, त्याठिकाणी वनविभागाचे परिमंडळ वनाधिकारी पोलादपूर श्री श्याम गुजर, वनरक्षक प्रियांका जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना विभागाचे परिमंडळ वनअधिकारी श्री श्याम गुजर त्यांनी शेतकऱ्यांना सदर परिसरात जाऊ नये अशा सूचना केल्या. तसेच, अशी कोणतीही घटना घडल्यास ताबडतोब परिमंडल वनाधिकारी पोलादपूर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, गोविंद केसरकर या शेतकऱ्याने वनविभागाकडे नुकसानभरपाईची मागणी देखील केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४०० सिमेंट पिशव्या, ३२ वर्षांचा संघर्ष… अखेर सुप्रीम कोर्टाचा निकाल! छत्रपती संभाजीनगर प्रकरणात नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: चाळीस प्रवाशांचे दहा तास हाल! नागपूर-मुंबई बस हर्सूल टोलजवळ बंद, महिला-मुले रात्रभर थंडीत कुडकुडले..

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपचे आंदोलन, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले

Gardening Tips: रोपांना मसूर डाळ टाकल्याने काय होते? माळी काकांनी उलगडलं रहस्य; बागकाम प्रेमींसाठी खास टिप्स

Maha Shivratri Rudrabhishek: भोलेनाथांची कृपा हवीये? मग ‘या’ योग्य मुहूर्तावर करा रुद्राभिषेक; जाणून घ्या संपूर्ण विधी आणि त्यामागचं महत्त्व

SCROLL FOR NEXT