'जनतेचं काहीही होऊ द्या, पण मी पुन्हा येईन'!- जयंत पाटील यांचे विरोधकांवर टीकास्त्र 
मुंबई

'जनतेचं काहीही होऊ द्या, पण मी पुन्हा येईन'!- जयंत पाटील यांचे टीकास्त्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : "कोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेचे जे होईल ते होईल; मात्र मी परत सत्तेत येईन' यासाठी सुरू असलेले विरोधी पक्षाचे प्रयत्न म्हणजे कोत्या मनाची मानसिकता दर्शवते, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पाटील यांनी झूम ऍपवरून पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वेळी बोलताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती, आर्थिक संकटाचा भविष्यकाळ आणि अशा संकटाच्या काळात विरोधी पक्ष भाजपच्या सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या यावर जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत जाण्यासाठी राज्यपालांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, की त्यांना हा प्रस्ताव मान्य करावा लागेल. कारण घटनात्मकदृष्ट्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा राज्यपालांना फार काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. पत्रावर त्यांना सकारात्मक निर्णय घ्यावाच लागेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सक्षम असून, ते आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. याचदरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते हे सरकार कोसळणार या भावनेतून सुरुवातीपासूनच टपलेले आहे. याचा उल्लेख करत जयंत पाटील यांनी विरोधी पक्षाच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष वेधले. 

सत्तेत येण्याची विरोधकांना अत्यंत घाई झालेली असून, महाविकास आघाडीने आपल्या समन्वयातून चालवलेला कारभार पाहता भारतीय जनता पक्षात नैराश्‍य दाटून आले आहे. पक्षाच्या नेत्यांना या नैराश्‍यातून बाहेर काढण्यासाठी सत्ता येणार अशा प्रकारची आवई उठवण्याबाबत हा पक्ष माहिर असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी झगडत असताना भाजप मात्र सत्तेत येण्याची संधी शोधत आहे. हे दुर्दैवी असून महाविकास आघाडीने आपल्या सत्तेचा खुंटा बळकट केला आहे. तो आता पुढील 15 वर्षे कायम राहील, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Congress Merger : शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? काँग्रेस नेत्यांकडून सूचक वक्तव्य; राहुल गांधी, खर्गे निर्णय घेणार

FDA Action: तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन मोड! राज्यभरात धडक कारवाई सुरूच, एका दिवसात चार कोटींचा साठा जप्त, २१ जण अटकेत

Fifa World Cup 2026 : दक्षिण कोरियाचा जबरदस्त कमबॅक; जर्मनी, पोर्तुगाल अन् आता झेकीयावर विजय, युरोपियन संघांवर दादागिरी

E22, E25, E27 पेट्रोलवर सरकारचा मोठा निर्णय! तुमच्या कार-बाईकवर काय परिणाम होणार? मायलेज, इंजिन आणि किंमतीबाबत जाणून घ्या

Hasan Mushrif Setback : हसन मुश्रीफांना दणका! गडहिंग्लज नगराध्यक्षांसह आजरा सभापतींचा जातीचा दाखला अवैध

SCROLL FOR NEXT