अस्वाली गावातील ग्रामस्थ आणि तरूणांनी लावलेला फलक. 
मुंबई

दारुची बाटली, चिकन नको; काम करा, मगच मत मागा!

सकाळ वृत्तसेवा

बोर्डी ः अस्वाली गावातील आदिवासी शेतकरी कुटुंबातील महिला आणि तरुणांनी दारू पार्टी, पैसा देणाऱ्यांना मत देणार नाही, तर काम करा आणि मते मिळवा, असा इशारा देणारा फलक लावला आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागात दारूच्या पार्ट्या आणि पैशांवर मते मिळवण्याचा अनेक उमेदवारांचा फंडा असतो; मात्र आम्ही जागे झालो आहोत, तुम्ही पण जागे व्हा, बाटली नको, चिकन नको, काम करा, मत मिळवा. दारू, पैसा, पार्टी देणाऱ्याला मत देणार नाही.

आमचा पाडा विकत घेता येणार नाही, असा इशारा देणारा फलकच अस्वाली येथे लावण्यात आला आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड भेदाचा वापर करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उमेदवारांची ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे पंचाईत होणार आहे. 

सोमवारी (ता.७) जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून ३१ डिसेंबरपासून राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या भागात मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार सुरू केल्याने ग्रामीण भागातील जनता जागी झाली आहे, असे चित्र या फलकबाजीवरून स्पष्ट झाले आहे.

ग्रामीण भागातील नवमतदार सुशिक्षित झाला आहे. त्याला समाजाचा, गावाचा विकास हवा आहे. अनेक वर्षांपासून निवडणुका आल्यावर पैशांची व दारूची खैरात वाटून मते मागणारे नेते विकासाची कामे करत नाहीत, असा अनुभव आहे. म्हणून उमेदवाराने दारू पार्टी देण्याचे प्रयत्न करू नये; किंबहुना काम दाखवून मते मिळवावीत.
राजेश पालवा, जमशेद गोरात, आदिवासी कार्यकर्ते, अस्वाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा फटका! स्वारगेट मेट्रो स्थानकांत गळती, प्लॅटफॉर्मवर ठेवल्या बादल्या; पाहा VIDEO

Low Cost Loan: लोन पाहिजे? मग PPF खात्यावर मिळवा स्वस्तात कर्ज! किती रक्कम मिळते? व्याजदर किती? जाणून घ्या संपूर्ण नियम

Latest Marathi News Update : पुण्यात मोठे ट्रॅफिक बदल; पालखी सोहळ्यामुळे निर्णय

कमळीचा मॉडर्न अवतार पाहिलात का? अभिनेत्री विजया बाबरने शेअर केला हटके व्हिडिओ, मरीन ड्राईव्हवर वनपीस घालून...

Dombivli: शिवसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात धिंगाणा! महिला डॉक्टरसह नर्सला मारहाण; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, काय घडलं?

SCROLL FOR NEXT