मुंबई

कोरोना गेला उडत! राजोडी समुद्रकिनाऱ्यावर तरुणाईच्या प्रेमाला बहर; पावसाळी वातावणाचा आनंद लुटन्यासाठी गर्दी

संदीप पंडित


विरार:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पर्यटन स्थळे आणि समुद्र किनारे बंद केली आहेत. अशातच लॉकडाऊनला वैतागलेल्या तरुणाईने आज वसई तालुक्यातील राजोडी किनारा गाठला आणि मनमुराद मोकळ्या वातावरणाचा आनंद घेतला यावेळी सरकारी नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे.  

गेल्या चार महिन्यापासून लॉकडाऊनमुळे जेरीस आलेली तरुणाईने आता सर्व सरकारी नियमे पायदळी तुडवून राजोडी समुद्रकिानारा गाठल्याने चित्र दिसले. सध्या राज्यभर मान्सून व्यापल्याने पावसात हिंडायची मजा लुटन्यासाठी तरुणाई सज्ज आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग पाहता ते शक्य होत नाही. परंतु असे असतानाही राजोडीच्या समुद्रकिनाऱ्यावर पाऊस आणि मोकळ्या वातावरणाचा आनंद घेताना तरुण-तरुणी दिसून आले. या किनाऱ्यावरील तरुण - तरुणींची अचानक झालेली गर्दी पाहता. याठिकाणी प्रशानसनाचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे यातच अर्नाळा समुद्र किनाऱ्यासह बाजूच्या किनाऱ्यालगठीची ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट ठरत असतानाही पर्यटक आणि तरुण बिनदासपणे राजोडी किनाऱ्यावर वावरताना दिसत होते. त्यामुळे या भागात वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशानसनाने जास्त कडक पाऊले उचलावीत असे स्थानिकांचे म्हणने आहे.

--------------------------------------------------------
Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT