mumbai congress sakal
मुंबई

Loksabha Election: कॉंग्रेसला लढायच्या आहेत मुंबईतल्या चार जागा!

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

Loksabha Election: महामुंबईतील वर्चस्व परत मिळवण्याची हीच संधी असल्याने किमान चार लोकसभेच्या जागा लढायला मिळाव्यात, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे.

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याने काँग्रेसला पुन्हा एकदा पाय रोवण्याची संधी आहे. पक्ष फुटल्याने शिवसेनेला जास्त जागा देणे ‘इंडिया’ला उपयोगाचे नाही.

काँग्रेसने ही भूमिका पहिल्याच बैठकीत मांडली आहे. ‘इंडिया’त चर्चा सुरू असली, तरी काँग्रेसने नमते घेणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दक्षिण मध्य, उत्तर पश्‍चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण या चार जागा काँग्रेसला हव्या आहेत. विभाजित शिवसेनेसमोर नमते घेण्याची गरज नाही, असे काँग्रेसने नवे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना पहिल्याच महाराष्ट्र दौऱ्यात सांगितले आहे.

या जागा मिळणे शक्य नसल्याचे सांगू नका; अन्यथा मिलिंद देवरांसारखा ज्येष्ठ आणि काँग्रेस कुळातला नेता बाहेर पडण्याचा विचार करत असेल, तर ते पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत घातक ठरेल, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी, आमचा आग्रह कायम राहील, असे सांगितले आहे. महामुंबई हा मिनी भारत असल्याने येथील संदेश देशभर जाईल. त्यामुळे आपण हट्टाबाबत कायम असावे, असेही सांगितले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणात शिक्षा जाहीर; भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप यावर निर्णय?

Gangapur Fraud : गंगापूरमध्ये खोट्या भीतीचा डाव; पतीच्या संबंधाचे खोटे आमिष दाखवून विवाहितेची पाच लाखांची लूट

Pune Nashik Highway Crash: पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; आयटी अभियंत्याचा मृत्यू, पत्नींसह सात जखमी

SCROLL FOR NEXT