Mumbai Rain 
मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईकरांसाठी आज पुन्हा मनस्तापाचा दिवस; तिन्ही लोकल सेवेकर काय झालाय परिणाम? नोकरदारांचे हाल

Mumbai Rain Update Local Railway News: पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

कार्तिक पुजारी

Mumbai Rain: मुंबईसह परिसरात काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी देखील पावसाची रिपरिप कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढणार आहे. पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

लोकल सेवेकर काय झाला परिणाम?

पावसाचा लोकल सेवेवर सुद्धा परिणाम झाला आहे. तिन्ही मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वे १० ते १४ मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर रेल्वे १५ मिनिटे, तर पश्चिम रेल्वे १० मिनिटे उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळे लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन लोकांना करण्यात येत आहे.

अंधेरी सबवे पाणीखाली गेला आहे. त्यामुळे सब-वेवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बांद्रा, खार, सांताक्रूझ, कांदेवरी-बोरिवली, अंधेरी, गौरेगाव, मालाड, जोगेश्वर या ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे. पहाटेपासून पाऊस सुरु असल्याने १ ते २ फूट पाणी साचले आहे.

मुंबईत हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. पालिकेकडून नालेसफाईचा दावा प्रत्येकवेळी करण्यात येतो. पण, त्यांचा दावा फोल ठरल्याचं डोळ्यासमोर आहे. पाणी साचले असल्याने वाहन चालकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. ट्रॅफिक पोलीस याठिकाणी उपस्थित असून दुर्घटना घडू नये यासाठी ते खबरदारी घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

SCROLL FOR NEXT