मुंबई

Maharashtra Politics: कडूंनी सत्तेचा सदुपयोग केला की दुरुपयोग? दरेकरांचा सवालं !

सकाळ वृत्तसेवा

बच्चू कडू यांनी दीर्घकालीन राजकारण करावे : प्रवीण दरेकर

आमदार बच्चू कडू हे नवनीत राणा यांच्यावरील राग महायुतीवर काढत आहेत, मात्र त्यांनी तत्कालिक उद्वेग न करता दीर्घकालीन राजकारण करण्याचा सल्ला विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज (ता. २५) येथे दिला.

बच्चू कडू यांनी महायुतीवर केलेल्या टीकेला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू हे वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळी विधाने करतात. त्यांचे राजकारणच सनसनाटी निर्माण करणे, प्रवाहाविरुद्ध बोलणे यावर अवलंबून आहे. सत्तेचा सदुपयोग आम्ही करतो, मात्र बच्चू कडूही सत्तेत आहेत, त्यांच्यावर दिव्यांग खात्याची जबाबदारीही दिली आहे. मग त्यांनी सत्तेचा सदुपयोग केला की दुरुपयोग केला हे त्यांनी सांगावे, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यापासून बच्चू कडू सरकारविरोधात बोलत आहेत. ते महायुतीवर राग काढत आहेत. म्हणजेच सरकारवर काढत असल्याचा आरोपही त्यांनी कडू यांच्यावर केला. तसेच त्यांनी दीर्घकालीन राजकारण करण्याची गरज असून तात्कालिक उद्वेग करू नये, असा सल्लाही दरेकर यांनी दिला. यावेळी त्यांनी बच्चू कडू महायुतीसोबतच राहतील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावरूनही त्यांना टोला लगावला आहे.

..

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

राहुल गांधी यांचे साथीदार झाल्याने उद्धव ठाकरे हे देखील पिकनिक करू लागले आहेत. शेवटी संगतीचा परिणाम असतो. उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वरून फेसबुक लाईव्ह कारभार करत होते. आता राहुल गांधी यांची संगत असल्याने परदेशातील वास्तव वाढायला लागले आहे, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी ठाकरे यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT