varsha gaikwad  sakal media
मुंबई

... तर मराठी शाळेत जर्मनी भाषाही शिकवली जाईल - वर्षा गायकवाड

शालेय शिक्षणात जर्मन भाषा शिकवण्याचा प्रस्ताव नक्कीच विचाराधीन!

सकाळ वृत्तसंस्था

मुंबई : शिक्षणाच्या क्षेत्रात असलेली आव्हाने लक्षात घेऊन त्यासाठी जर्मन भाषेचा (German language) आणि तेथील तंत्रज्ञानाचा वापर शालेय शिक्षणात होणे आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणात जर्मन भाषा शिकवण्यासाठी नक्कीच विचार केला जाईल, असे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज व्यक्त केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्यातील एक हजारांहून अधिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळ माध्यम समूह, जर्मन दूतावास व म्युनिचच्या महाराष्ट्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्लोबल महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत मागदर्शनपर अशा दुसऱ्या टप्प्यातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी गायकवाड बोलत होत्या.

राज्यातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. कार्यक्रमात जर्मनीतील वाणिज्य दूतावासात कार्यरत असलेले मराठी अधिकारी डॉ. सुयश गायकवाड यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणमंत्र्यांनी जर्मन भाषा शालेय शिक्षणात शिकवली जावी, यासाठीचा प्रस्ताव डॉ. गायकवाड यांनी मांडला. त्यावर मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, की जर्मन ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे; पण इंग्रजीही महत्त्वाची असल्याने आपण ती पहिलीपासून सुरू करत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर येत्या काळात आंतरराष्ट्रीय भाषा शालेय शिक्षणात शिकवता येईल, असेही त्यांनी सांगितले. जर्मन कौन्सिलने आम्हाला वेळोवेळी प्रशिक्षण, अभ्यास पद्धती, व्यवसाय शिक्षण आदी विषयांसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जर्मन कौन्सिलने मार्गदर्शन करावे!

जर्मन तंत्रज्ञान, त्यांचे अभ्यासक्रम शालेय जीवनात तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आणता येईल. त्यासाठी त्यांची नेमकी अभ्यासपद्धती, त्यांची शिकवण्याची पद्धती, क्रेडिट पॅटर्न, तिथे कशा प्रकारे अभ्यासक्रम शिकवले जाते आदींचा अभ्यास करून त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे असलेल्या उणिवा-त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करता येईल. त्यासाठी जर्मन कौन्सिलने आम्हाला मार्गदर्शन करावे, असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले.

विद्यार्थी हे देशाचे भवितव्य

आपले सगळेच विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहे. आज जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुले बाहेरच्या देशात शिकायला जातात. शालेय जीवनापासून त्यांना सकाळ माध्यम समूह आणि जर्मन कौन्सिलच्या अशा करिअर संधी आणि त्यासाठी करण्यात येत असेलल्या प्रयोगामुळे मार्गदर्शन मिळाले तर ते भविष्यात मोठी भरारी घेऊ शकतील, अशा शब्दांत शिक्षणमंत्र्यांनी सकाळ माध्यम समूह, जर्मन दूतावास आणि महाराष्ट्र मंडळ (म्युनिच)ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

जर्मन भाषेच्या प्रस्तावाचा विचार करू

आपल्याकडे विद्यार्थ्यांना जपानी आणि इतर भाषा बोलता येते, त्याचप्रमाणे जर्मनही बोलता यायला हवे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना त्या भाषेमुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकेल, विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच मातृभाषेप्रमाणेच इतर भाषेचे शिक्षण घेतले तर त्याचाही फायदा होऊ शकेल. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणात जर्मन भाषा शिकवण्यासाठीच्या प्रस्तावाचा नक्कीच विचार करू, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT