make local railway from uran to csmt demand of mahesh baldi mumbai sakaln
मुंबई

Mumbai Local News : उरणवरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पर्यत रेल्वे लोकल सेवा सुरू करा - महेश बाळदी

उरण हुन मुंबई कडे ही शिक्षणासाठी विद्यार्थी नोकर वर्ग आणि छोटे मोठे व्यापाऱ्यांची संख्या ही अधिक आहे

सकाळ वृत्तसेवा

Uran News : उरण करांचे 50 वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाल्यानंतर उरण -नेरुळ उरण बेलापूर अशी दर पाऊण तासांनी रेल्वे सेवा उरणच्या प्रवाशांना सुरू करण्यात आली आहे.मात्र उरणच्या प्रवाशांना थेट मुंबईत जाण्यासाठी थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पर्यत रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी उरणचे आमदार महेश बाळदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 12 जानेवारी ला उरण- खारकोपर या दुसऱ्या टप्यातील रेल्वे मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर उरण ते नेरुळ आणि उरण ते बेलापूर अशी रेल्वे सेवा दर पाऊण तासांनी सुरू करण्यात आली आहे.

सिडको, मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत 27 किमी लांबीचा आणि 1782 कोटी खर्चाच्या नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.27 किमी रेल्वे मार्गवरील पहिल्या टप्यातील 11 स्थानकांपैकी नेरुळ, सीवूड, सागर संगम,

बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर 12.5 किमी अंतरापर्यंत प्रवासी वाहतूक सुरू रेल्वे करण्यात आली . त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी, उरण या स्टेशन दरम्यान 14.3 किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्यातील विविध अडथळे दूर करून रेल्वे मार्ग प्रवाशी वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.

त्यामुळे मुंबई,नविमुंबई ठाणे ,बेलापूर जाणारे

विद्यार्थी ,नोकरवर्ग छोटे मोठे व्यापारी अशा प्रवाशांना रस्त्याच्या वाहतूक कोंडीतून सुटकारा मिळाला आहे. त्यामुळे पैशाची आणि वेळेची ही बचत होत आहे. उरण रेल्वे ने नेरुळ गाठण्यासाठी आणि बेलापूर गाठण्यासाठी 40 मिनिटांचा अवधी लागत आहे. 15 रुपये लागत आहेत. असून निश्चित स्थळी आपला प्रवास करीत आहेत.

मात्र उरण हुन मुंबई कडे ही शिक्षणासाठी विद्यार्थी नोकर वर्ग आणि छोटे मोठे व्यापाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. उरण हुन मोरा मार्गे भाऊचा धक्का जलप्रवास खर्चिक झाला आहे.

त्यापेक्षा रेल्वे प्रवास त्याच वेळेत कमी पैशात मुंबईला जाता येते त्या साठी उरणच्या प्रवाशांना थेट मुंबईला जाता यावे यासाठी उरण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पर्यत लोकल सेवा सुरू करण्याची मागणी उरणचे आमदार महेश बाळदी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT