malaysia penang sakal
मुंबई

Malaysia Tour : मलेशियाच्या पेनांगमध्ये भारतीय पर्यटकांसाठी पायघड्या

भारतीय पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी मलेशियातील पेनांग पर्यटनस्थळ उत्सुक असून त्यांच्यातर्फे आज मुंबईत रोड शो करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भारतीय पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी मलेशियातील पेनांग पर्यटनस्थळ उत्सुक असून त्यांच्यातर्फे आज मुंबईत रोड शो करण्यात आला. भारतीयांसाठी येथे अनेक आकर्षक सोयी-सुविधा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पेनांगचे पर्यटन मंत्री वान हॉन वाई आणि सीईओ अश्विन गुणसेकरन यांनी यावेळी पत्रकारांना ही माहिती दिली. पेनांग ओडिसी ही यावेळी त्यांची थीम आहे. हनिमून साठी जाणारी जोडपी, तसेच व्यवसाय वृद्धीसाठी तेथे येणारे व्यावसायिक आणि कंपन्यांचे अधिकारी आदींचा पेनांगच्या पर्यटन क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत भर घालण्यात मोठा वाटा असल्याचे वान यांनी सांगितले.

येथील भारतीय पर्यटकांची संख्या यंदा सव्वा सात टक्के वाढली असून क्रूझ टुरिझम देखील वाढला आहे. पेनांगच्या पर्यटन क्षेत्रात भारतीय पर्यटक दुसऱ्या क्रमांकावर आहेत, असेही गुणसेकरन म्हणाले. पेनांगच्या पुरातन स्थळांना युनेस्कोनेही मान्यता दिली आहे. पूर्वेची सिलिकॉन व्हॅली अशी ख्याती असलेल्या पेनांगमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. चीन मधून बाहेर पडणाऱ्या अमेरिकी कंपन्या येथे येत आहेत, असे वान हॉन म्हणाले.

भारत, चीन तसेच मध्यपूर्वेतील पर्यटकांना येथे व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. पेनांग ते थायलंड यादरम्यान भरपूर थेट विमानसेवा असल्याने पर्यटकांना तेथेही जाता येईल. पेनांग ही मलेशियाची खाद्यपदार्थांची राजधानी आहे. येथे अनेक वॉटर पार्क, थीम पार्क असून येथील एका थीम पार्क मध्ये तर एक किलोमीटर लांबीची जगातील सर्वात मोठी वॉटर स्लाईड आहे. आशियातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यानही येथे असल्याचे गुणसेकरन म्हणाले.

मालदीव व भारत यांच्यातील वादाचा पेनांगमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांवर काहीही दुष्परिणाम होणार नाही. भारतीय पर्यटकांबरोबरचे व भारताबरोबरचे आमचे चांगले संबंध कायमच राहतील. आम्हाला भारताचा मोठाच पाठिंबा मिळतो, असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT