man Arrested over harassing nurse at Asangaon railway station marathi crime news  
मुंबई

Kalyan Crime : आसनगाव रेल्वे स्थानकावर नर्सशी छेडछाड; अश्लील चाळे करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : आसनगावला राहणाऱ्या आणि टिटवाळ्यामध्ये एका खाजगी रुग्णालयामध्ये नर्सचे काम करणाऱ्या 21 वर्षीय नर्सची आसनगाव रेल्वे स्टेशन वर छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात नाईट शिफ्टसाठी जात होती. यावेळी रेल्वे स्टेशवरच अश्लील वर्तन करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न एका नराधमाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आसनगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 2 वर हा प्रकार घडला. संबंधीत तरुणी लोकलची वाट पाहत थांबल्यानंतर अश्लील हावभाव करत तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न निलेश अरुण गायकवाड या व्यक्तीने केला. भेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev Kangana Ranaut : बाबा रामदेव यांचा कंगना रणौतवर पलटवार; म्हणाले, ‘अशा लोकांबद्दल टिप्पणी करायची नाही’

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

Sugar Rate : दिवाळीपर्यंत साखर शंभरी पार जाण्याची भीती; राज्यात १८ लाख टन साठा शिल्लक

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

माझी इच्छा नव्हती सुनीधीकडून गाऊन घ्यायची... अवधूत गुप्तेने सांगितली 'कांदे पोहे' गाण्याची कथा; मराठी अभिनेत्रीने आधीच गायलेलं गाणं

SCROLL FOR NEXT