मुंबई

महसूल मंत्र्यांच्या निवासस्थानी 'त्या' व्यक्तीनं केला आत्महत्येचा प्रयत्न

अनिश पाटील

मुंबई: राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्यात एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पांडुरंग वाघ असे या व्यक्तीचे नाव असून हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष कार्यकारी अधिकारी दालनात या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला अडविले आणि मोठा अनर्थ टळला. पांडुरंग वाघ हे अहमदनगर नेवासा येथील झापडी गावाचे रहिवाशी आहेत. वाघ यांनी राज्य सरकारकडुन 2018 मध्ये वाळू उत्खनन आणि वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यानी राज्य सरकारकडे 8 लाख 72 हजार भरले होते आणि वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केले होते. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही.

त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पांडुरंग वाघ यांनी पुन्हा राज्य सरकारचे दार ठोठावले आणि आपले भरलेले पैसे परत मिळावे म्हणून यांनी पाठपुरावा सुरू केला होता. पांडुरंग वाघ यांनी भरलेले 8 लाख 72 हजार रुपये त्यांना लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मात्र योग्य वेळी पोलीसांनी वाघ यांना अडवले आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी 41 (1) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली. तसेच या पुढे असं पाऊल न उचलण्यासाठी समज सुद्धा पोलिसांनी वाघ यांना दिली.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Man attempted end of life Royal Stone Bungalow residence Balasaheb Thorat

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT