Airport sakal
मुंबई

हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी बनावट तिकीट काढून विमानतळात प्रवेश! CISFने आवळल्या मुसक्या | Mumbai Airport

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बनावट तिकीट तयार करून विमानतळावर प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. ही घटना १४ मे रोजी घडली असून नूर शेख असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मागच्या प्रवासात हरवलेल्या फोनची माहिती घेण्यासाठी हा खटाटोप केल्याचं शेख याने सुरक्षा दलाला सांगितलं आहे.

अधिक माहितीनुसार, १४ मे रोजी रात्री दहा वाजता हा व्यक्ती विमानतळाच्या मेन गेटवर आला आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) बनावट तिकीट दाखवून आत प्रवेश केला. पुढे तिकीट काऊंटरवर गेल्यानंतर हे तिकीट बनावट असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर काऊंटरवरील कर्मचाऱ्यांनी CISF च्या जवानांना ही माहिती दिली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला ही माहिती मिळताच त्यांनी सदर व्यक्तीला अटक केली. दरम्यान, शेख याची नोकरी गेल्यानंतर तो असे काम करू लागला, त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला असून मागच्या आठवड्यात दिल्ली ते मुंबई प्रवास करत असताना त्याचा मोबाईल हरवला होता असं शेख याच्या कुटुंबियांनी सांगितलं.

आपण बनावट तिकीट काढून विमानतळाच्या कार्यालयात जाऊन सीसीटीव्ही चेक करावेत या हेतून मी कृत्य केल्याचं आरोपी शेख याने पोलिसांना सांगितलं आहे.

आरोपीला सहर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. तर त्याच्याविरोधात आयपीसी कलम ४२०, ४६५ आणि ४६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT