संग्रहित  
मुंबई

वाढीव बिलाने माणगावकरांना विजेचा शॉक 

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : तालुक्‍यातील वीजग्राहकांना दुप्पट-तिप्पट वाढीव बिले दर महिना आल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सुमारे आठ लाखांची जादा वाढीव बिले आल्याने महावितरण वीज कंपनीने माणगावकरांना विजेचा शॉक दिला आहे. या बिलांचा निपटारा करण्यासाठी अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने वाढीव बिले कमी करण्यासाठी ग्राहकांना माणगाव येथील कार्यालयात दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. 

माणगाव तालुक्‍यात 40 हजार वीजग्राहक आहेत. तालुक्‍यातील निजामपूरजवळील भागाड येथे सुहास यशवंत महाडिक यांना जुलैपासून वाढीव बिल येत होते. त्यांचे वडील यशवंत नारायण महाडिक (वय 68) यांनी सहा महिने माणगाव येथे येऊन चकरा मारल्या. परंतु दर महिना त्यांना वाढीव बिल येत होते. ते बिले कमी करण्यास दर महिना माणगाव येथे येत होते. त्यांना मानसिक त्रास झाला. अखेर त्यांनी माणगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालयातच ठाण मांडून उपोषण सुरू केले. त्यानंतर महावितरण वीज कंपनीला जाग आली. 

माणगाव उपकार्यकारी अभियंता विजय मोरे यांनी महाडिक यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी पेण व रोहा येथील कार्यालयात संपर्क साधून महाडिक यांना दर महिना येणारे वाढीव जादा बिल तातडीने कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, असे सांगितले. त्यानुसार 1 फेब्रुवारीपासून महाडिक यांना नियमित वीजबिल येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे महाडिक यांनी उपोषण मागे घेतले.

वाढीव जादा बिल आल्यास दोन महिन्यांपर्यंत माणगाव, चार महिने झाले असतील तर रोहा आणि सहा महिने झाले असल्यास पेण आणि त्यानंतर भांडुप; मुंबई येथे प्रस्ताव पाठविण्यात येतो. त्यानंतर वाढीव बिल रद्द करता येते. माणगाव तालुक्‍यातून सुमारे 120 प्रस्ताव पाठविले असून टप्प्या-टप्प्याने ही जादा वीजबिले कमी होणार आहेत.

सुमारे चार हजार नादुरुस्त वीजमीटर बदलण्यात आले आहेत. या विभागात 62 पैकी 34 कर्मचारी काम करत आहेत. वीजवसुलीच्या केवळ अर्धा टक्काच टप्प्या-टप्प्याने वीजग्राहकांना वाढीव बिले अदा करण्यात येतात. एका वर्षात एकूण 500 वीजग्राहकांचे प्रस्ताव पाठविल्याची माहिती त्यांनी दिली. 

सध्या वीजबिले भरमसाठ येत आहेत. अनेकदा चुकीची वीजबिले येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. महावितरण कंपनीने योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच सुधारित वीजबिल वितरित करावीत. 
- हितेश वाघरे, तळेगाव, माणगाव 

वीज बिलाबाबत मीटर रीडिंग न घेता महावितरण कंपनी बेजबाबदारपणे वीजबिल तयार करतात. बिलामधील रीडिंग व दर याचा तालमेळ न घालता बिले तयार होतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. 
- मणिराम मुंढे, माणगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT