BJP-Pravin-Darekar-MLA-Prashant-Thakur 
मुंबई

"मराठा आरक्षण जाण्यामागे ठाकरे सरकारचा ढोंगीपणा जबाबदार"

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशनाची मागणी

विराज भागवत
  • मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशनाची मागणी

नवी मुंबई: मराठा समाजाच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दीड वर्षाच्या काळात ढोंगीपणा (Fake Approach) आणि खोटारडेपणा (Lie) करण्यात आला. मराठा समाजाला कायद्याद्वारे आरक्षण (Maratha Reservation) फडणवीस सरकारने दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हे आरक्षण टिकवण्यासाठी परिस्थिती ५० टक्केच्या वर अपवादात्मक (Exceptional) कशी आहे? हे दाखवून देणं गरजेचं होतं. पण या सरकारला ते जमलं नाही. आरक्षण रद्द झालं त्यामागे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची निष्क्रियता आणि ढोंगीपणा जबाबदार आहे, असा घणाघात राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी ठाकरे सरकारने केला. नवी मुंबईतील पनवेल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल हे मान्यवर उपस्थित होते. (Maratha Reservation BJP Pravin Darekar slams CM Uddhav Thackeray led Mahavikas Aghadi)

"मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं की नाही अशी शंका आता त्यांच्या मनात येऊ लागली आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत अंतिम सुनावणी न होता न्यायलायाने त्यास स्थगिती दिली. पण राज्य सरकारला आपली भूमिका मांडताच आली नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर यात विशेष लक्ष घातले जायला हवे पण तसे दिसत नाही. सरकार पूनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्या गोष्टीला इतके दिवस का लागले? खरं सांगायचं तर म्हणजे विषय समजून न घेता लोकांसमोर ढोंगीपणा कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिलं आहे", असे दरेकर म्हणाले.

"राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पत्र देतात. राज्यपालांकडून पत्र पुढे जाण्यास कालावधी लागेल हे माहिती असलं पाहिजे. पण मूळ प्रक्रिया डावलायची आणि सर्व खापर केंद्रावर फोडत खोटं चित्र उभं करायचं अशी भूमिका ठाकरे सरकारची आहे. राज्यपालांना पत्र, पंतप्रधानांची भेट या गोष्टींसह ज्या मूळ कारणामुळे आरक्षण गेलं त्या कारणाच्या मूळाशी पोहोचणं अधिक गरजेचं आहे. ठाकरे सरकारने आता तिथून पुढची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. एकमेकांची उणीदुणी काढत भाजप आणि केंद्र सरकारला आरक्षणासाठी जबाबदार धरणं बोगसपणाचं लक्षण आहे. पण मी सांगतो की भाजप पूर्णपणे मराठा समाजाच्या मागे उभी आहे. त्यांना सहकार्य करायलाही तयार आहे. त्यामुळे केवळ हवेत पोकळ घोषणा किंवा वक्तव्ये करत मराठा समाजाची दिशाभूल करू नका", असं दरेकर यांनी ठाकरे सरकारला सुनावलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनाची मागणी

"मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशनाची आमची मागणी आहे. वेगवेगळ्या टप्प्यावर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण, सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल, कोणाचं नेमकं काय चुकलं याची व्यापक चर्चा विधिमंडळात होऊ शकते आणि पुन्हा नव्याने आरक्षण देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी चर्चा होऊ शकते. त्यामुळे अशाप्रकारचं अधिवेशन घेण्याची आवश्यकता आहे आणि ते लवकर घ्यावे", अशी मागणीही दरेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT