मुंबई

बिनधास्त राज ठाकरे! कोरोनाला घाबरत नाही? गर्दी असूनही लावला नाही मास्क

पूजा विचारे

मुंबई: आज मराठी भाषा दिवस. या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दादर येथील शिवाजी पार्कमध्ये स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला राज्य सरकारनं परवानगी नाकारली. मात्र तरीही राज ठाकरेंच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. दरम्यान या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असूनही राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावला नव्हता. 

माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांना पत्रकारांनी तुम्ही मास्क का लावला नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनीही बेधडक उत्तर दिलं. मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतो, असं ते म्हणाले.

सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी राज ठाकरे यांनी सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. मात्र राज ठाकरे यांनी मास्क लावलेला नव्हता.

राज ठाकरे सरकारवर कडाडले 

मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. कोरोनाचं संकट येतं आहे असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Marathi Bhasha Din Mns Raj thackeray Sign Programme Without mask dadar Shivaji park

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT