मुंबई

Vidhan Sabha 2019 : सुक्षिशीत ठाण्यातले बहुसंख्य उमेदवार अल्पशिक्षीत

रामनाथ दवणे

तब्बल ऐंशी टक्के इतकं घसघशीत साक्षरतेचं प्रमाण असलेल्या ठाण्याचे भावी आमदार मात्र अल्पशिक्षीत असणार आहेत. कारण ठाण्यातल्या बहूतेक मतदारसंघातले उमेदवार जेमतेम दहावी पास आहेत. त्यामुळे तब्बल २४ आमदारांसह मुंबई खालोखाल राज्याच्या राजकीय पटलावर महत्व राखून असलेल्या ठाण्यातून दहावी पास आमदार विधानसभेत पोहोचणार आहेत. एक नजर टाकूयात ठाण्यातले कोणते उमेदवार अल्पशिक्षीत आहेत.

  • कोपरी पाचपाखाडीतून शिवसेनेचे उमेदवार आणि ठाण्याचे पालकमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे अकरावी पर्यंत शिकलेत.
  • ऐरोलीतून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले नवी मुंबईतले बडे नेते गणेश नाईक हे सुद्धा अकरावी पास आहेत.
  • ओवळा माजिवड्यातून शिवसेनेतर्फे उमेदवार असलेले प्रताप सरनाईक हे दहावी पास आहेत.
  • ठाणे शहर मतदारसंघातून आपलं नशीब आजमावणारे मनसेचे अविनाश जाधव हे सुद्धा दहावी पासच आहेत.
  • मुरबाड मतदारसंघातले भाजपचे उमेदवार किसन कथोरे अकरावी, तर उल्हासनगर मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती कलानी या बारावी पास आहेत.
  • मनसेचे प्रमोद पाटील, महेश कदम,भाजपचे कुमार आयलानी शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांनीही दहावीपर्यंतच शिक्षण घेतलंय.
  • विशेष म्हणजे भाजपच्या मंदा म्हात्रे,नरेंद्र मेहता, गणपत गायकवाड, आणि शांताराम मोरे या उमेदवारांना तर दहावीची परिक्षाही पास करता आलेली नाही.


निवडणूक आयोगाकडे सादर केलल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. मात्र याच ठाण्यातून डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, डॉ. बालाजी किणीकर, प्रकाश भोईर, प्रमोद हिंदुराव किंवा पांडुरंग बरोरा यांच्यासारखे उच्चशिक्षीत उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही बाब जरी खरी असली तरीही आगामी विधानसभेत ठाण्याचं प्रतिनिधित्व करणारे बहुसंख्य आमदार हे अल्पशिक्षीत असणार हे निश्चित.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : उत्तराखंडमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT