agitation sakal
मुंबई

Mumbai March : कोरोना योध्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आज मोर्चा

कोरोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्यांच्या न्याय मागण्यासाठी गुरुवारी (ता.२) रोजी सकाळी ११ वाजता म्यूनसिपल कामगार एकता मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोरोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्यांच्या न्याय मागण्यासाठी गुरुवारी (ता.२) रोजी सकाळी ११ वाजता म्यूनसिपल कामगार एकता मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई - कोरोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्यांच्या न्याय मागण्यासाठी गुरुवारी (ता. २) रोजी सकाळी ११ वाजता म्यूनसिपल कामगार एकता मंचाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. शासकीय व प्रशासकीय, आरोग्य यंत्रणा धडाधड ढासळत होत्या. रुग्णालयामधील व्यवस्था तर अतिशय गंभीर होती. अतिशय प्रशिक्षित स्टाफ ही गोंधळलेल्या अवस्थेत होता. अशा वेळी रुग्णांच्या मदतीला रुग्ण सेवकांनी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्ण सेवा दिली आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रुग्ण सेवकांना ही शासनात सामावून घेत, आर्थिक लाभ देण्याची मागणी म्यूनसिपल कामगार एकता युनियनने केली आहे.

कोरोनाची लाटेत सेवा देणाऱ्या कोरोना योद्यांना सरकार, आरोग्य विभाग आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कामावरून कमी करण्यात आले आहे. राज्यभरात अशा कर्मचाऱ्यांची संख्या हजारो आहे. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय हक्क व अधिकार मिळवून देण्याचा निश्चय म्युनिसिपल कामगार एकता युनियनने केला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या योद्यांना एकत्र करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न युनियनने केलेला असल्याचे अध्यक्ष मनोज यादव यांनी सांगितले आहे.

कोविड मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी करणे, योग्य प्रकारे वेतन न देणे, कोव्हीड भत्ता न मिळणे, भत्यामध्ये कंत्राटदार व व्यवस्थापनाने भ्रष्टाचार करणे, बोनस न देणे, अशा अनेक समस्या दिसून आल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीत कोव्हीड योद्यांना सामावून घ्या, कोव्हीड भत्ता अन बोनस द्या, कोव्हीड योद्यांना सैनिकांचा दर्जा द्या या मागण्यासाठी गुरुवारी जेजे रुग्णालय सिग्नल, रिचर्डसन अँड कृडास कंपनी येथून आझाद मैदानावर मोर्चा जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

'मला कॅन्सर झाला कारण...' किमोथेरिपीबद्दल बोलताना मेधा मांजेकर म्हणाल्या... 'त्रास व्हायचा तेव्हा...'

SCROLL FOR NEXT