Mumbai Fire  Sakal
मुंबई

अंधेरीत सिनेमाच्या सेटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल

सकाळ डिजिटल टीम

Massive Fire In Mumbai Andheri : मुंबईतील अंधेरी येथे भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ ते 10 गाड्या दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चित्रकूट मैदानावरील चित्रपटाच्या सेटला ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये कुणी अडकले आहेत का? याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,अंधेरीतील डीएनए नगरमधील चित्रकूट मैदानावर एका चित्रपटाच्या सेटला ही आग लागली आहे. या आगीव नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असून, आगीचे लोटच्या लोट आकाशात परसरलेले दिसून येत आहेत. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मुंबई आपत्ती विभागाकडून ही आग लेव्हल 2 ची असल्याचे सांगण्यात आले असून, चित्रकूट मैदानावर तात्पूरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सिनेमाच्या सेटला ही आग लागली यामध्ये तेथील सर्व सामान जळून खाक झाले आहे. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जिवीत अथवा मनुष्य हानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. चित्रकूट मैदानावर अनेक चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी छोटे- छोटे सेट उभरण्यात येतात. त्यातीलच एका सेटला ही आग लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतापासून सर्वात दूरचा देश! जगातील सर्वात रहस्यमय बेट, अंटार्क्टिका अन् वाळवंट... 'या' देशाने भारतीयांना दिलं खास आमंत्रण

IND vs ENG 2nd T20: संजूचा पत्ता कट? दुसऱ्या टी-20 आधी वैभव सूर्यवंशीबाबत मोठी अपडेट! दुसऱ्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्गातील करूळ घाटात दरड कोसळली; महामार्गावरील वाहतूक ठप्प

Sting Ban: विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय! शाळांजवळ ५०० मीटरमध्ये स्टिंग पेय विक्रीवर बंदी, महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्देश

Shaktipeeth Expressway : शेतीच्या मुळावर उठलेला शक्तिपीठ रद्द करा; उरुण-ईश्वरपूर पालिकेत सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी, बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर

SCROLL FOR NEXT