Mumbai Sakal
मुंबई

म्हाडात विविध संवर्गात ५६५ पदांची मेगाभरती

१४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) (Mhada) विविध संवर्गातील ५६५ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांना १७ सप्टेंबर (September) सकाळी ११ वाजेपासून ते १४ ऑक्टोबरला (October) रात्री २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.

म्हाडाच्या विविध मंडळातील पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामावर परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेता म्हाडा प्राधिकरणाने रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उपअभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.

या पदांचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास व प्राधिकरणाच्या https://mhada.gov. in या अधिकृत संकेतस्थळावर १७ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून उपलब्ध राहणार आहे. म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. तसेच भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Marathi News Live Updates : राज्याचे आरोग्यमंत्री अमरावतीत दाखल, डफरिन रुग्णालयाची करतायेत पाहणी

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

SCROLL FOR NEXT