Mhada-Home sakal
मुंबई

म्हाडाची यंदाही सोडत नाही; मुंबईकरांना आणखी पाहावी लागणार वाट!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळामार्फत काढण्यात येणारी घरांची सोडत सलग दुसऱ्या वर्षीही निघणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंडळाकडे घरांचा साठा उपलब्ध नसल्याने यंदाही सोडत (Mhada Lottery) काढणे कठीण असल्याचे मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे म्हाडाच्या सोडतीकडे डोळे लावून बसलेल्या राज्यभरातील नागरिकांना (People awaits) आता पुढील वर्षाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. (Mhada homes lottery not for this year not availability mhada homes people awaits)

म्हाडाच्या सोडतीकडे राज्यभरातील नागरिक उत्सुकतेने वाट पाहात असतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून मंडळाकडे जमिनीअभावी घरे उपलब्ध होत नसल्याने खूप कमी घरांची सोडत काढण्यात येत आहे. या सोडतीमध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून व यापूर्वीच्या सोडतीमध्ये विजेत्यांची ताबा न घेतलेल्या घरांचा समावेश करण्यात येतो. 2019 मध्ये मंडळाने सोडत काढली होती. यानंतर गेल्यावर्षी सोडत काढण्यासाठी घरे नसल्याने सोडत निघू शकली नव्हती. यंदा सुमारे एक हजार घरांची सोडत काढण्यासाठी मंडळाने तयारी सुरू केली होती. परंतु, पुरेशा प्रमाणात घरे हाती नसल्याने मंडळाला यंदाही सोडत काढता येणार नसल्याचे, सूत्रांनी सांगितले.

पहाडी गोरेगाव येथे सुमारे 4 हजार घरांचे काम सुरू आहे. या इमारतींचे बांधकाम पूर्ण होण्यास पुढील वर्ष लागणार आहे. त्यामुळे या घरांचा समावेश पुढील वर्षी काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये करण्याचा मंडळाचा विचार आहे. येथील प्रकल्पाचे काम अजून बरेच शिल्लक असल्याने या घरांची यंदा सोडत काढणे शक्य नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

"घरांच्या संख्येअभावी यंदा सोडत काढणे कठीण आहे. परंतु, आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुढील वर्षाच्या सोडतीमध्ये गोरेगावच्या प्रकल्पातील घरे समाविष्ट होतील."

डॉ. योगेश म्हसे - मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT