Raj Thackeray 
मुंबई

Raj Thackeray : "...तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!"; राज ठाकरेंची मुलुंड येथील घटनेवर संतप्त प्रतिक्रिया

रोहित कणसे

मराठी असल्याने मुलुंडमध्ये महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याप्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर याबद्दल पोस्ट केली असून त्यांनी हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित असा इशारा दिला आहे.

मुलुंड पश्चिममधील एका सोसायटीत महाराष्ट्रीयन असल्याने जागा नाकारण्यात आल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या घटनेविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. सदर महिला मुलुंडमधील एका सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहण्यासाठी गेली असता महाराष्ट्रातील व्यक्ती असल्याने एका गुजराती व्यक्तीने जागा नाकारली होती. यासंदर्भात तृप्ती देवरुखकर या महिलेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

राज ठाकरे काय म्हणालेत?

"मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला."

"हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.

काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे."

"अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!" असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : कुंभमेळ्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांची भेट; समाधानकारक मोबदला देण्याची मागणी

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT