Crime News sakal
मुंबई

Mumbai Crime : मी नकोशी! जन्मदात्या आईने नवजात अर्भकाला शौचालयातून दिले फेकून

पोलीसांनी सखोल चौकशी केल्यावर धक्कादायक वास्तव आलं समोर

सकाळ डिजिटल टीम

पनवेलमध्ये जन्मदात्या आईने आपल्या नवजात अर्भकाला शौचालयातच जन्म देऊन शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी संबंधित अविवाहित आईविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलमधील उलवे येथील सेक्टर 21 मधील अदिनाथ अर्पण इमारतीमध्ये मध्यरात्री मीटरबॉक्सच्या पार्कींगमध्ये हे अर्भक पडलं असल्याचं आढळून आलं होतं.

परिसरातील राहिवाश्यांनी काय पडलं आहे हे पाहण्यासाठी गर्दी केली आहे. पोलीस आले तरी इमारतीमध्ये कोणीही सांगायला तयार नव्हते. मात्र पोलीसांनी इमारतीमधील अनेक घरांमध्ये चौकशी केल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर संपूर्ण माहिती समोर आली आहे. अदिनाथ अर्पण इमारतीमधील एका घरामध्ये काही तासांपुर्वी 19 वर्षीय तरुणीच्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे या तरुणीला नेण्यासाठी रिक्षा आणण्यासाठी ते गेले असल्याचे पोलीसांना चौकशीतून समजले. संबंधित 19 वर्षीय तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी नेरुळ येथील मासाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात घेऊन गेल्यावर नूकतेच संबंधित तरुणीने बाळाला जन्म दिल्याचे स्पष्ट झाले.

मामाच्या मुलासोबत शारीरिक संबंधातून हे बाळ जन्मले असल्याचे संबंधित तरुणीने पोलिसांना सांगीतले. गेले आठ महिने गरोदर असूनही तीचे पोट दिसत नव्हते त्यामुळे तीने गरोदरपणाची बाब नातेवाईकांपासून लपवून ठेवल्याचे कबूल केले. या इमारतीतील आडे कुटूंबात ही तरुणी राहत होती. त्यांनीही संबंधित तरुणीला पोटदुखत असल्याने डॉक्टरांकडे नेले होते. डॉक्टरांनीही सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तोपर्यंत मध्यरात्रीच हा धक्कादायक प्रकार घडला. तरुणीविरोधात पोलीसांनी अर्भकाच्या खूनाचा गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Tamil Nadu CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा अनोखा निर्णय! जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मिळणार सोन्याची अंगठी; 'मामा'ची अनोखी भेट

Maharashtra News: मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून नाराजी? सुनेत्रा पवारांकडून विचारणा; तटकरे यांचा इन्कार

Pune Rain: पुणेकरांना दिलासा! आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; पुढील २-३ दिवस हलक्या सरींचा अंदाज

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

SCROLL FOR NEXT