Mumbai Mounted police eSakal
मुंबई

Mumbai Mounted Cops: मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच घोडेस्वार पोलीस; सरकारची मंजुरी, कुठे-कुठे घालणार गस्त?

After 88 years, Mumbai to get mounted police unit squads: घोडेस्वार पथकाला पुनर्जीवित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता काही दिवसातच रस्त्यावर मुबईकरांना घोड्यावर बसलेले पोलीस पाहायला मिळतील.

कार्तिक पुजारी

Mumbai News: - मुंबईकारांना आता शहरात घोडेस्वार पोलीस (mounted cops) फिरताना पाहायला मिळणार आहेत. घोडेस्वार पथकाला पुनर्जीवित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता काही दिवसातच रस्त्यावर मुबईकरांना घोड्यावर बसलेले पोलीस पाहायला मिळतील.

घोडेस्वार पथकासाठी सरकारने ३८.४१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस लवकरच ३० घोडे खरेदी करणार आहे. गर्दीचे ठिकाणे, मोर्चे तसेच समुद्रकिनारे आणि पदपथांवर घोडेस्वार पथक गस्त घालणार आहे. त्यामुळे मुंबईत घोडस्वार पोलीस पाहण्याची उत्सकुता असेल. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ट्रॅफिक व्यवस्था चांगल्या पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था चौख ठेवण्यालाठी या घोडेस्वार पोलिसांची मदत होणार आहे. १९३२ मध्ये घोडेस्वार पथकाला ट्रॅफिक संबंधी काही मुद्द्यावरून बरखास्त करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर घोडेस्वार पथक आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण, त्याला मुहूर्त मिळत नव्हता.

घोडस्वार पोलिसांचा फायदा काय?

दाव्यानुसार, एक घोडेस्वार पोलीस गस्त घालणाऱ्या ३० पोलीस कर्मचाऱ्यांइतके काम करू शकतो. घोडेस्वार अत्यंत कमी वेळात जवळच्या ठिकाणी पोहोचू शकतो. वेग ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते. पोलिसांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने गस्त घालू शकतात.

अशा प्रकारचे घोडेस्वार पथक गर्दीच्या ठिकाणी, समूद्राच्या ठिकाणी किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी खूप फायद्याचे ठरू शकतात. या युनिटला वॉकी-टॉकी दिली जाते. पोलिसांना दिलेले घोडे हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे लोकांना या घोड्यांचा त्रास होणार नाही. आता प्रत्यक्षात घोडेस्वार पोलीस मुंबईकरांना कधी पाहायला मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT