tree 
मुंबई

Mumbai : ३३ लाख झाडे देताहेत मुंबईकरांना प्राणवायू; मुंबईतील वृक्षसंपदेची जागतिक स्तरावरही दखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई महानगराच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही ३३ लाख झाडे महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील सरकारी, खासगी, औद्योग‍िक जम‍िनींवर तसेच महानगरातील व‍िव‍िध उद्यानांमध्ये आण‍ि रस्तांभोवती बहरलेली आहेत.

पाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाने येत्या वर्षभरात मुंबईमध्ये नवीन २५ हजार झाडे लावण्याचा विशेष संकल्प केला आहे. वर्षभरात नागरी वन उपक्रमात आणखी ५० हजार झाडे लावली जाणार आहेत. मुंबईत वृक्षसंपदा जतन आणि संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून सतत नवनवीन उपक्रम हाती घेतले जातात.

पालिकेचा बहूमान

मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल अलीकडे जागतिक स्तरावरदेखील घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशनकडून “जागतिक वृक्ष नगरी " हा अत‍िशय प्रत‍िष्ठेचा पुरस्कार सन २०२१ आण‍ि २०२२ अशी सलग दोन वर्ष मुंबई महानगराला म‍िळाला आहे.

रस्ते आणि उद्याने बहरली

मुंबईतील रस्ते, उद्याने आणि सरकारी आणि खाजगी आणि औद्यागिक जमिनीवर २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील वृक्ष बहरले आहेत.

वर्षभरात 25 हजारांचे टार्गेट

उद्यान व‍िभागाकडून सर्व २४ विभागांमध्ये प्रात‍िन‍िधीक स्वरुपात २०० झाडे लावण्यात आली आहेत. येत्या वर्षभरात मुंबईमध्ये पारंपर‍िक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्याचा पालिकेचा मानस आहे.

चार लाख झाडे लावली

पालिकेच्या उद्यान व‍िभागाने आतापर्यंत म‍ियावाकी पद्धतीने चार लाखापेक्षा अधिक झाडे लावली आहेत.

उद्यानांमध्ये दाटली ह‍िरवळ

सध्या मुंबईकरांच्या सेवेत तब्बल १,०६८ उद्याने आहेत. याठ‍िकाणी बहरलेली वृक्षसंपदा, तेथील ह‍िरवळ, पक्ष्यांचा क‍िलब‍िलाट मुंबईकरांना आनंद देवून जातो. उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे, पार्क आण‍ि इतर मोकळ्या जागा विकसित आहेत. त्यात हिरवळ दाटली आहे.

जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक नागरी वने (मियावाकी) पद्धतीने वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. प्रामुख्याने सोनचाफा, सीता अशोक, तामण, बकुळ, कांचन, बहावा, जांभूळ, नारळ, कडूनिंब, आंबा, पेरू, करंज, वड, पिंपळ यासारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न केले पाहिजेत

- जितेंद्र परदेशी, उद्याने अधिक्षक, मुंबई महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT