Mumbai Airport sakal
मुंबई

Mumbai Airport smuggling: मुंबई विमानतळ परिसरात 'पार्सल' फेकणाऱ्या दोघांना अटक!

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Airport : सव्वा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून दोघांना अटक केली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जलालुद्दीन व संजिता बेगम अशी आरोपींची नावे असून दोघेही चेन्नईतील रहिवासी आहेत.

सोने लपवलेले एक पार्सल आरोपींच्या साथीदाराने आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमानतळ परिसरात फेकले होते. साथीदाराने ठरलेल्या ठिकाणी टाकलेले पार्सल घेण्यासाठी दोघे आरोपी आले असता सीआयएसएफ सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले.

आरोपींच्या साथीदाराने १२ सप्टेंबर रोजी विमानतळ परिसरात सोन्याचे पार्सल फेकले होते. त्यात मेणामध्ये सोन्याची भुकटी लपवण्यात आली होती. अशा सहा मेणबत्त्या त्या पुड्यात सापडल्या होत्या. त्यात २५३४ ग्रॅम सोन्याची भुकटी सापडली.

सोन्याची किंमत बाजारात सव्वा कोटी रुपये आहे. १३ सप्टेंबर रोजी आरोपी सोने नेण्यासाठी आले असता त्यांना सुरक्षा रक्षकांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या झडतीत त्यांचाकडे सोने सापडले. आरोपी सोने मुंबई विमानतळावरून तमिळनाडूमध्ये नेणार होते.

आरोपींच्या चौकशीत त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता आणि त्याने त्यांना सोने आणण्यासाठी सांगितले होते असे आढळले आहे. सोन्याच्या तस्करीसाठी पैसे मिळणार होते; पण त्यापूर्वीच त्यांना विमानतळावर पकडण्यात आले.

दोन्ही आरोपींविरोधात सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सर्व प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय असून सीमाशुल्क विभाग त्याबाबत तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT