Mumbai Airport  Sakal
मुंबई

Video : मुंबई एअरपोर्टवर कोट्यवधींचे सोने अन् परकीय चलन जप्त; तर, कोचीत प्रवाशाने...

याशिवाय इतर दोन कारवायांमध्ये सीमाशुल्क विभागाने एका प्रवाशाकडून सुमारे ९०,००० अरब अमिराती दिराम आणि ९०,००० अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News : मुंबई विमानतळावरून सीमाशुल्क विभागाने कोट्यवधी रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त केले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

8 आणि 9 फेब्रुवारी 2023 रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सीमाशुल्क विभागाने एका व्यक्तीकडून सुमारे 2.8 किलो सोने जप्त केले असून, ज्याची किंमत सुमारे 1.44 कोटी रुपये आहे.

याशिवाय इतर दोन कारवायांमध्ये सीमाशुल्क विभागाने एका प्रवाशाकडून सुमारे ९०,००० अरब अमिराती दिराम आणि ९०,००० अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहे. जप्त केलेल्या विदेशी चलनाची किंमत अंदाजे 92 लाख रुपये आहे.

अमेरिकन डॉलर्सची तस्करी करणाऱ्या आरोपी प्रवाशाने हे डॉलर एका पॅकेटमध्ये ठेवले होते. तसेच दिरामची तस्करी करणाऱ्या व्यक्तीने एका बॉक्समध्ये दिराम ठेवले होते. कसून चौकशीनंतर आरोपी पकडला गेला.

शरीरात लपवले सोने

तर, कोची येथील एका प्रकरणात विमानतळावरूनही कस्टम विभागाने एका प्रवाशाकडून जवळपास 805.62 ग्रॅम सोने जप्त केले आहे.

जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये असून आरोपी प्रवाशाने हे सोने आपल्या शरीरात कॅप्सूलच्या स्वरूपात लपवून ठेवले होते.

रिशाद असे आरोपीचे नाव असून तो केरळमधील पलक्कडचा रहिवासी आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT