Mumbai-Airport sakal
मुंबई

Mumbai Airport : विमान प्रवाशांसाठी खुशखबर! दररोज ९७५ विमानाचे होणार उड्डाण

मुंबई विमातळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विमातळाने २९ ऑक्टोबर पासून ते ३० मार्च २०२४ पर्यत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई विमातळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विमातळाने २९ ऑक्टोबर पासून ते ३० मार्च २०२४ पर्यत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या हिवाळी वेळापत्रकाच्या तुलनेत यंदा हिवाळी वेळापत्रकात ८ टक्के उड्डाणाची संख्या वाढणार आहे.

तसेच हिवाळी वेळापत्रकानुसार मुंबई विमानतळावरुन दररोज ९७५ विमानाचे उड्डाण होणार आहे. याशिवाय ११५ ठिकाणी नविन विमान सेवा सुरु केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यात बाहेर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिवाळी, नाताळ आणि नवीन वर्षाच्या हंगाम्यात बाहेर गावी जाणाऱ्या आणि पर्यटक स्थळी भेट देणाऱ्यांची संख्या वाढत जाते, या काळात विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई विमानतळ प्रशासनाने यंदाचा हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. मुंबई विमातळाने २९ ऑक्टोबर पासून ते ३० मार्च २०२४ पर्यत हिवाळी वेळापत्रक लागू केले आहे.

त्यानुसार गेल्या वर्षीच्या हिवाळी वेळापत्रकाच्या तुलनेत यंदा हिवाळी वेळापत्रकात ८ टक्के उड्डाणाची संख्या वाढणार आहे. तसेच हिवाळी वेळापत्रकानुसार मुंबई विमानतळावरुन दररोज ९७५ विमानाचे उड्डाण होणार आहे. तसेच ११५ ठिकाणी नविन विमान सेवा सुरु केली आहे.

ज्यामध्ये अल्माटी आणि बालीकडे नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांसह, एअर कॅनडा आणि अझरबैजान एअरलाइन्सद्वारे ऑपरेशन्स पुन्हा सुरू करून फ्लाइट ऑपरेशन्सचा विस्तार करत आहे. मुंबईला जाणार्‍या आणि तेथून प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता एन्टेबे, लागोस आणि इतर अनेक मोहक आफ्रिकन स्थळांना भेट देता येणार आहे.

मध्य पूर्वेमधील सर्वात मोठी विमान कंपनीपैकी असलेली एमिरेट्स एअरलाइन्सने १९ ऑक्टोबर २०२३ पासून भारतात आपला प्रीमियम इकॉनॉमी केबिन क्लास सादर केला आहे. ज्याची सुरुवात मुंबई विमानतळापासून होत आहे. ३० ऑक्टोबरपासून एअरलाइन अधिकृतपणे हा केबिन वर्ग सुरू करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT