Ajit Pawar sakal
मुंबई

Mumbai : अजित पवार दिवाळीनंतर राज्याचा दौरा करणार

तटकरे संघटना बळकट करणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवाळी नंतर राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी येथे दिली. यातून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बळकट संघटन उभे राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरातील विविध ३० आघाडीच्या प्रमुखांची बैठक आज झाली.

या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तटकरे यांनी अजित पवार यांच्या दौऱ्याची माहिती दिली. आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडी तसेच अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका यावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले

आमचे दौरे लवकरच सुरू होतील. संघटना मजबूत करण्यासाठी तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध विभागांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेष करून महिला आणि युवकांचे काम अत्यंत उत्तम सुरू असल्याचे तटकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT