apala davakhana sakal
मुंबई

Mumbai News : बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात आतापर्यंत ९ लाख लाभार्थी

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंदर्गत एकूण १५९ दवाखान्यात आतापर्यंत ९ लाख ३ हजार ५४५ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंदर्गत एकूण १५९ दवाखान्यात आतापर्यंत ९ लाख ३ हजार ५४५ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे.

गेल्या १७ नोव्हेंबर रोजीच्या पुण्यतिथी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'हिंदुह्दयस्रमाट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. सुरूवातीच्या महिन्यात सरासरी लाभार्थींच्या वाढीच्या संख्येने आता वेग घेतला आहे. सुरूवातीच्या काळात म्हणजे नोव्हेंबर २०२२ मध्ये असणारा २ महिने ७ दिवस इतक्या एक लाख लाभार्थींची संख्या गाठण्याचा वेळ आता १५ दिवसांवर आला आहे. त्यासोबतच दवाखान्यांच्या संख्येतही वेगाने भर पडलेली आहे. अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत १५९ पर्यंत दवाखान्यांची संख्या पोहचली आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी दवाखान्यांच्या संख्येत भर पडतानाच प्रत्येक एक लाख लाभार्थींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. एकूण १५९ दवाखान्यांच्या माध्यमातून या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या आता ९ लाखांवर पोहचली आहे. म्हणजेच लाभार्थ्यांची संख्या आता दशलक्ष होण्याच्या दिशेने सरकते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rapido Captain Earnings : तीन महिन्यांत रॅपिडो चालवून बीबीए विद्यार्थ्याने कमावले ६५ हजार; गिग इकॉनॉमीचा घेतला अनुभव

Post Office Scheme: मुलीच्या भविष्यासाठी मोठी कमाई! फक्त 200 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 4.30 लाखांचा फंड; पाहा संपूर्ण गणित

रजनीकांतांचा जलवा; रिलीजआधीच ‘जेलर 2’ने केली 160 कोटींची कमाई

Latest Marathi News Live Update : तहसीलदाराला उडवून देण्याची धमकी

Shiv Sena: "आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का?"; सुप्रीम कोर्टाने थेट विचारलं, नार्वेकरांचा आदेशही रद्द केला जाऊ शकतो

SCROLL FOR NEXT