Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटातील एक 'मोठा' पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो; आमदार राजू पाटीलांचा गौप्यस्फोट

म्हणून फेरीवाल्यांची समस्या सूटत नाही.

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो, म्हणून डोंबिवलीतील स्टेशनं बाहेरील फेरीवाल्यांची समस्या सूटत नाही. पोलिसांनी पूरावा मागितला तर आम्ही पुरावे देऊ; असा गौप्यस्फोट मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.तसेच केडीएमसी आयुक्त यांच्यावरही मनसे आमदार यांनी निशाणा साधला आहे..

डोंबिवली स्टेशन बाहेर पुन्हा एकदा फेरीवाले बसयाला सुरवात झाली आहे.रेल्वे स्टेशनं पासून 150 मिटर परिसरात फेरीवाले बसू देऊ नये असा कोर्टाचा आदेश असून सुद्धा महापालिका प्रशासन लक्ष देत नाहीं आहे, तर दुसरीकडे 'ना फेरीवाला झोन' मध्ये सुद्धा फेरीवाल्यांचे बस्तान मांडले आहे.यातच आता डोंबिवली मधील थोर व्यक्तीचा अवमान होत असलेला व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

डोंबिवली भाजपचे आमदार आणि मंत्री यांनी डोंबिवली पूर्वेला स्टेशन बाहेर डोंबिवली मधील थोर व्यक्तींचे फोटो आणि माहिती देत भीतीवर सुशोभीकरण केले होते, मात्र याचं फोटोवर फेरीवाले यांनी आपले समान लकटवत आपला दंधा सुरु केला आहे, याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे, दरम्यान याकडे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण कधी घालणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तर दुसरीकडे केडीएमसी आयुक्त यांनी स्टेशन परिसरातील पाहणी केली होती आणि फेरीवाल्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले, मात्र ते आश्वासन राहिले. प्रत्यक्षात मात्र फक्त दिखावा कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान याचं विषयावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. मनसे आमदार यांनी सांगितले की डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो, म्हणून डोंबिवलीतील स्टेशनं बाहेरील फेरीवाल्यांची समस्या सूटत नाही. पोलिसांनी पुरावा मागितला तर आम्ही पुरावे देऊ.त्याचबरोबर

कल्याण शीळ रस्त्यावर गर्डर टाकण्याचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे, त्याठिकाणी बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र केडीएमसी आयुक्त कारवाई करीत नाही.कंट्रोल रूममधून बसून पैसे गोळा करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचाही आरोप पाटील यांनी यावेळी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT