Mumbai sakal
मुंबई

Mumbai : पक्षातील नेत्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस निरिक्षकांच्या मालमत्तेवरून भाजप आक्रमक! ईडी-सीबाआय...

भाजपाने पत्रकार परिषद घेत वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांची बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती दिली.

शर्मिला वाळुंज

Mumbai - डोंबिवली भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नंदू यांच्यावर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत भाजपने मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी केली आहे. बागडे यांची बदली न होता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने भाजपचा रोष वाढताना दिसत आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बागडे यांची बेहिशोबी मालमत्ता आहे. एवढी संपत्ती एका वरिष्ठ पोलिस निरिक्षकाकडे कोठून आली ? असा आरोप पत्रकार परिषदेत केला. ही मालमत्ता त्यांनी कशी कमविली याची चौकशी व्हावी यासाठी ईडी, सीबीआय संबंधित खात्याकडे मागणी करणार आहोत. त्याविषयी कागदपत्र देखील सादर करणार असल्याचे प्रदेश सचिव गुलाबराव करुंजुले यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर राहुल दामले, नंदू परब आदि पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाने पत्रकार परिषद घेत वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांची बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती दिली. या मालमत्तेची कागदपत्रे ईडी, सीबीआय संबंधित विभागाकडे पाठविली जाणार असून याची चौकशी व्हावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. एका वरिष्ठ पोलिस निरिक्षकाकडे एवढी मालमत्ता कशी येते याची माहिती मिळाली पाहीजे.

त्यासाठी या मालमत्ते संदर्भात ईडी, सीबीआयची चौकशी झाली पाहीजे अशी आमची मागणी आहे. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांना अयोग्य वागणूक देत आहेत. याविषयी वारंवार पोलिस खात्याच्या वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे प्रदेश सचिव करंजुले यांनी सांगितले. हे पहाता कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद काही शमण्याचे नाव घेत नाही.

राजकीय वरदहस्तामुळे भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी केली. त्यांची बदली होत नसल्याने कल्याण येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आक्रमक होत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली.

यामध्ये बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचे तसेच शिंदे गटास सहकार्य न करण्याचा ठराव मांडला. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कमालीचे नाराज झाले असून त्यांनी भाजपा शिवसेना युतीसाठी खासदार पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्पष्टीकरणानंतर हा वाद शमेल असे वाटत असतानाच ठाणे येथे पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात भाजपा आमदार संजय केळकर यांनी ठाणे व कल्याण लोकसभा मतदार संघ हे आपले होते, यापुढेही राहतील असे म्हणत स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भावना बोलून दाखविली आहे. त्यातच डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते हे बागडे यांच्या बदलीवरुन आक्रमक पवित्रा घेत असून आता हा वाद पुढे कोणते वळण घेतो हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT