Mumbai Local sakal
मुंबई

Mumbai Breaking : लोकलमध्ये साखळी स्फोटांची धमकी; पोलिसांना आला फोन, मुंबईत एकच खळबळ

Mumbai Breaking : नियंत्रण कक्षाला आज सकाळी हा फोन आला

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Breaking : मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडालीये. हा फोन आज सकाळी आला.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आज सकाळी हा फोन आला असून फोनवर बोलताना संबंधित व्यक्तीनं मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं.

अधिक माहिती अशी की, यावेळी महिला पोलिस शिपायानं संबंधित व्यक्तीकडून अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली.

त्या व्यक्तीला त्याच्या ठिकाणाबाबत विचारले असता, त्यानं तो जुहू विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचं सांगत फोन कट केला. काही वेळानं फोन करणाऱ्यानं त्याचा मोबाईल बंद केला होता.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना संबंधित पोलिस ठाण्याला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT