प्रतिभा पाटील sakal
मुंबई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील भारतीय चलनावर छायाचित्र यावे

कल्याण मधील संकल्प प्रतिष्ठानची पुन्हा आग्रही मागणी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : केंद्रीय अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय चलनावर रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे छायाचित्र वापरण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. असे झाल्यास त्याचा आनंद असेल संकल्प प्रतिष्ठानने याविषयी 2010 मध्ये आरबीआय आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पत्रव्यवहार करीत मागणी केली होती. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील फोटो भारतीय चलनवर यावा, महाराजांचे स्मारक उभे राहिल तेव्हा राहील. त्याआधी भारतीय चलनावर त्यांचा फोटो यावा अशी आमची आग्रही मागणी असल्याचे संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन कदम यांनी सांगितले.

भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय चलनावरील छायाचित्र परिवर्तनाचा विचार करत आहे. महात्मा गांधी यांच्यासोबत रविंद्रनाथ टागोर, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे छायाचित्र वापरण्याचा विचार करत आहे. याविषयी कल्याणच्या संकल्प प्रतिष्ठानने 2010 साली भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसेच तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पत्रव्यवहार करीत मागणी केली होती. प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन कदम याविषयी म्हणाले, आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. राष्ट्रपुरुष यांच्यासोबतच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र भारतीय चलनावर यावं अशी देखील आमची मागणी होती.

आरबीआयने त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभे राहणार आहे ते होईल, तेव्हा होईल परंतु सरकारने याचा देखील विचार करावा.आम्ही यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली होती, आजही त्यासाठी प्रयत्नशील आहोत असे देखील कदम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT