Corona Vaccination Sakal media
मुंबई

BMC : विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत 50 हजारांहून अधिक नागरिक सुरक्षीत

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी, कोविड नियमांचे (corona rules) पालन आणि लसीकरण (corona vaccination) हा एकमेव मार्ग आहे. मुंबईत 16 जानेवारीपासून लोकांना टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जात आहे, परंतु काही लोक असे आहेत ज्यांना लसीकरण करणे फार महत्वाचे असून ते लसीकरण केंद्रापर्यंत (vaccination center) पोहचू शकत नाहीत. किंवा त्यांना जास्त वेळ लसीकरणाच्या रांगेत उभे राहता येणार नाही. अशा नागरिकांसाठी पालिका विशेष लसीकरण मोहिम (special vaccination drive) राबवत आहे. ज्या अंतर्गत आतापर्यंत 53,428 नागरिकांना लसीकरण झाले आहे.

पालिकेने स्तनदा मातांसाठी मे महिन्याच्या अखेरीस लसीकरण मोहीम सुरु केली, त्यानंतर 31 मे रोजी अभ्यास आणि नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर, दिव्यांग आणि मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर, महानगरपालिकेच्या विशेष मोहिमेअंतर्गत गर्भवती महिला आणि अंथरुणाला खिळून असलेल्यांना त्यासह स्ट्रिट वेंडर्ससाठी लसीकरण केले जात आहे.

परदेशी जाणाऱ्या 28, 753 नागरिकांचे लसीकरण

मुंबईचे असे अनेक लाभार्थी आहेत, ज्यांना अभ्यास, नोकरी आणि इतर कामांमुळे परदेशात जावे लागते. यामुळे महानगरपालिकेने एका विशेष मोहिमेअंतर्गत या वर्गासाठी लसीकरण सुरू केले. आतापर्यंत 28,753 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे, त्यापैकी 3, 962 जणांनी पहिला डोस घेतला आहे आणि 24, 791 ने दोन्ही डोस घेतले आहे.

8773  स्तनदा मातांचे लसीकरण

मुंबईत महानगरपालिकेने आतापर्यंत विशेष मोहिमेअंतर्गत 8773 स्तनदा मातांचे लसीकरण केले आहे. यापैकी 7285 मातांनी पहिला डोस आणि 1488 ने दुसरा डोस घेतला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या लसीकरणात लाभार्थीला रांगेत उभे न राहता त्वरित लसीकरण केले जाते.

1973 दिव्यांग आणि मानसिक आजाराने ग्रस्त झाले सुरक्षित

महानगरपालिकेने 4, 166 दिव्यांग आणि मानसिक आजारांनी ग्रस्त लोकांना सुरक्षेचा डोस दिला आहे. यापैकी, 3487 ला पहिला आणि 679 ला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या वर्गाच्या लोकांना केंद्रात आल्यावर लगेच लसीकरण केले जाते.

5331 बेडरिडन रुग्णांचे लसीकरण

पालिकेकडे 5 हजारांहून अधिक बेडरिडन रुग्णांची नोंद लसीकरणासाठी झाली असून आतापर्यंत 5, 331 लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पालिकेतील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने लसीकरण केले आहे. यापैकी, 3, 648 जणांना पहिला आणि 1, 683 नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत.

ओळखपत्र नसलेल्या लाभार्थ्यांनाही लसीकरण

मुंबईत असेही काही नागरिक आहेत ज्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. देह विक्री करणाऱ्या महिला , तृतीयपंथी. महानगरपालिकेने या लोकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत अशा एकूण 4,865 लोकांना लसीकरण केले आहे, त्यापैकी 3,714 जणांनी लसीचे पहिले आणि 1, 151लोकांनी दोन्ही घेतले आहेत.

1, 540 गर्भवती मातांना सुरक्षेचा डोस

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने गर्भवती महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीमही सुरू केली आहे. समुपदेशनापासून ते गर्भवती महिलांच्या लसीकरणापर्यंत त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत 1, 540 मातांना लसीकरण करण्यात आले आहे, त्यापैकी 1,264 ने पहिला डोस घेतला आहे आणि 276 गर्भवतींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT