Mumbai Crime 
मुंबई

Mumbai Crime : 7 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कांदिवली पूर्व परिसरात 7 वर्षांच्या मुलीशी गेल्या वर्षभरापासून असभ्य वर्तन करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला कांदिवली पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपी हा मुलीचे वास्तव्य असलेल्या इमारतीत सुरक्षा रक्षक आहे.

याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने केलेल्या अत्याचाराच्या संदर्भात कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी घाबरली होती.

पीडित मुलगी राहत असलेल्या सोसायटीमध्ये काम करणारा 45 वर्षीय सुरक्षा रक्षक गेल्या एक ते दीड वर्षांपासून पीडित मुलीला असभ्यरित्या स्पर्श करत होता. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी रविवारी पोलिसाकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल गेऊन तत्काळ गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पोलिसांनी राहत्या घरातून सुरक्षा रक्षकाला अटक केली.आरोपीने पीडित मुलीला गळा कापून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीने हा प्रकार कोणलाही सांगितला नाही. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT