Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: मुंबई पुन्हा हादरली; खाऊचे आमिष दाखवून केले चिमुलीचे अपहरण अन्

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: नेरूळ रेल्वे स्टेशनसमोरील पदपथावर राहणाऱ्या ४ वर्षांच्या लहान मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता.

नेरूळ पोलिसांनी ४८ तासांत आरोपीचा माग काढून अपहृत मुलीची सुटका केली आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. मणी थॉमस असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी मुलीला परराज्यात नेऊन विकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही चारवर्षीय मुलगी नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहते. २१ सप्टेंबर रोजी मुलगी रेल्वे स्टेशनजवळ आपल्या दोन भावंडांसह पदपथावर खेळत होती. या वेळी आरोपी थॉमस याने तिला खाण्याचे आमिष दाखवून सोबत नेले.

रस्त्यालगतची पाणीपुरी खाऊ घातली. त्यानंतर त्याने मुलीला रिक्षात बसवून पळवून नेले. मुलगी बराच वेळ न सापडल्याने तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढगे व सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेवाळे यांनी मुलीचा शोध सुरू केला.

त्यासाठी दीडशे सीसीटीव्हीचा तपास करण्यात आला. आरोपी नेरूळमधील करावे गावातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. आरोपी मुलीला केरळमध्ये घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT