Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: वाढदिवसाची पार्टी करुन स्पा'मध्ये आला अन् अनोळखी लोकांनी केले सपासप वार...वरळीत हत्येमुळे खळबळ

Worli Crime: सोबत असलेल्या महिलेने त्याचवेळी पोलिसांना या घटनेची माहिती का दिली नाही?

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai Update: विलेपार्ले येथे राहणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हरी वाघमारे(५०) या व्यक्तीची बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास वरळीच्या ' सॉफ्ट टच स्पा ' मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली.

या प्रकरणी वरळी पोलिसांनी घटना घडली तेव्हा हरीसोबत स्पामध्ये हजर असलेली तरुणी आणि हत्या घडण्यापूर्वी स्पा मधून बाहेर पडलेल्या तीन पुरूष कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या हत्येबाबतची माहिती एखाद किलोमिटर अंतरावर असलेल्या वरळी पोलिसांना बुधवारी दुपारी दोनच्या आसपास मिळाली. सोबत असलेल्या महिलेने त्याचवेळी पोलिसांना या घटनेची माहिती का दिली नाही, याबाबत चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ग्राहक म्हणून हरीची या स्पामध्ये वरचेवर ये जा होती. त्यामुळे स्पा चालक आणि कर्मचारी त्याचे परिचित होतें १७ जुलैला त्याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पार्टी देण्याचा हट्ट या कर्मचाऱ्यांनी केला. हरी आणि स्पातील चौघांनी शीव परिसरात पार्टी झोडली. दोनच्या आसपास ते पुन्हा स्पामध्ये परतले. यातील तरुणी आणि हरी एका खोलीत गेले. काही वेळाने तीन पुरुष कर्मचारी स्पामधून बाहेर पडले. त्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी स्पामध्ये प्रवेश केला आणि हरी याच्यावर धारदार हत्याराने बरेच वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समजते.

दुपारी हत्येची माहिती मिळताच वरळी पोलीस पथकासोबत परिमंडळ तीनचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरी याचा मृतदेह शव चिकित्सेसाठी नायर रुग्णालयात पाठविण्यात आला.

अनोळखी व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त उपाध्याय यांनी दिली. हरी याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT