cocaine Sakal
मुंबई

Mumbai Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; १५ कोटींचे कोकेन पकडले

Druges in Mumbai: नवी दिल्लीतून ३० वर्षीय परदेशी महिलेला अटक केली

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: विलेपार्ले परिसरातून जप्त करण्यात आलेल्या १५ कोटी रुपयांच्या कोकेन तस्करीप्रकरणी एनसीबीने नवी दिल्लीतून ३० वर्षीय परदेशी महिलेला अटक केली. रेहेमा ऑगस्टिनो असे अटक करण्यात आलेल्या परदेशी महिलेचे नाव असून ती मूळची टान्झानिया देशाची नागरिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने विलेपार्ले येथील देशांतर्गत विमानतळाच्या शेजारी असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ९ नोव्हेंबरला कारवाई करून एनसीबीने दोन किलो कोकेन जप्त केले होते. याप्रकरणी गिलमोर लेसी अँडी नावाच्या झांबिया देशाच्या नागरिकाला अटक केली होती.

चौकशीत आरोपी अनेक दिवसांपासून परदेशातून भारतात कोकेन घेऊन येत असल्याचे सांगितले. त्या बदल्यात त्याला पैसे मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने मुख्य आरोपींच्या सहभागाबाबत तपासाला सुरुवात केली.

आरोपीची अधिक चौकशी केली असता जप्त करण्यात आलेले कोकेन आरोपीला नवी दिल्लीत पोहोचवायचे होते. त्यानंतर एनसीबीचे एक पथक दिल्लीला रवाना झाले. त्यांनी कोकेन तस्करीबाबत माहिती घेतली असता याप्रकरणी रेहेमा या परदेश महिलेचा सहभाग उघड झाला. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिचाही याप्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

अखेर तिला याप्रकरणी अटक करून दिल्लीतील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. तेथे ट्रान्झिट रिमांड घेऊन परदेशी महिलेला मुंबईत आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करत असून या मागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT