Mumbai Crime  sakal
मुंबई

Mumbai Crime: अंधेरीत सेफ्टी टँकमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ; शरिरावरील जखमांमुळं हत्येचा गुन्हा

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अंधेरी ओशिवरा परिसरात इमारतीच्या सेफ्टी टॅकमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीच्या शरिरावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्यानं हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. (Mumbai Crime dead body was found in safety tank at Andheri)

सुत्रांच्या माहितीनुसार,एसव्हीएस रोड जोगेश्वरी येथील प्लॉट नं. ४, बिल्डिंग बांधकाम लेबरकॅम्प इथं हा मृतदह सेफ्टी टॅकमध्ये आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून अंदाजे ४० ते ५० वर्षाची ही व्यक्ती असण्याचा अंदाज पोलिसांचा आहे. (Latest Marathi News)

या मृतदेहाच्या दंडावर व हातावर गंभीर जखमा असून या व्यक्तीची हत्याकरून पुरावे नष्ठ करण्याच्या हेतून त्याचा मृतदेह सेफ्टी टँकमध्ये टाकल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३०२, २०१ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT